Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील सध्या चर्चेत असणारी सदस्य म्हणजे चाहत पांडे. चाहतच्या रिलेशनशिपबाबत चर्चांना उधाण आलं आहे. वीकेंडच्या वारला सलमान खानने चाहतचा एक फोटो दाखवला. तेव्हापासून चाहतच्या रिलेशनशिपविषयी बोललं जात आहे. चाहत एका गुजराती मुलाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण, अभिनेत्रीने सलमान समोर बॉयफ्रेंड नसल्याची कबुली दिली आहे. तरीही सोशल मीडियावर चाहतचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरूनच आता करणवीर मेहराने चाहतला डिवचल्याचं समोर आलं आहे.

‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर नुकताच ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये करणवीर मेहरा चाहताला रिलेशनशिपवरून टोमणे मारताना दिसत आहे. पण, यावरून चाहतचा पारा चढतो आणि ती भांडी फेकते. त्यानंतर ती रडताना दिसत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Bigg Boss 18 Vivian Dsena Is Upset With salman khan and Kamya Panjabi
Bigg Boss 18: “…तर माझ्याजागी दुसऱ्याला बोलवा”, सलमान खान-काम्या पंजाबीने सुनावल्यानंतर विवियन डिसेना नाराज; म्हणाला, “तेव्हा मी बंडखोर..”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bigg boss marathi meenal shah built luxurious bungalow in goa
Bigg Boss फेम अभिनेत्रीने गोव्यात बांधला भलामोठा आलिशान बंगला! ‘ड्रीम हाऊस’ म्हणत शेअर केले फोटो; म्हणाली, “हा प्रवास…”
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Bigg Boss 18 List Of Richest Contestants In Bigg Boss 18 And Their Net Worth Not Vivian Dsena, This Actress Tops The List
Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील टॉप-९ सदस्यांमध्ये कोण आहे सर्वाधिक श्रीमंत? जाणून घ्या संपत्ती
Govinda Family
गोविंदामुळे मुलगी टीनाला बॉलीवूडमध्ये मिळाले नाही काम; सुनिता आहुजा म्हणाली, “घर चालवण्यासाठी तिला…”
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
sana khan welcomes second baby boy
धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, दीड वर्षांचा आहे पहिला मुलगा

हेही वाचा – Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…

प्रोमोमध्ये चाहत शिल्पाला सांगतेय की, खूप काही कमवलंय. पण ती घाम गाळून केलेली कमाई आहे. त्यानंतर करणवीर विचारतो, तुझ्याकडे इतकं काम होतं. तर तुला अ‍ॅनिव्हर्सरी साजरी करायला कसा वेळ मिळाला? तेव्हा चाहत म्हणाली, “तू याची काळजी करू नकोस.” मग करण मिश्किलपणे हसला.

त्यानंतर चाहत करणला म्हणते की, मेहरा मी उत्तर देऊ शकत नाही. पण मी बरंच काही बोलू शकते. पुढे चाहतचा राग अनावर होतो आणि ती समोर असलेली भांडी करणच्या अंगावर फेकताना दिसत आहे. ती करणला इथून निघून जा असं बोलते आणि नंतर एकट्यात रडताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ‘टाइमपास’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी घेतलं नवं आलिशान घर, वास्तुशांतीचे खास क्षण शेअर करत म्हणाले, “गावातील छोट्याशा घरातून…”

चाहत आणि करणच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनेकांनी करणला ट्रोल करून चाहतला पाठिंबा दिला आहे. “करण तुला लाज वाटली पाहिजे”, “करण ट्रॉफी जिंकण्यास पात्र नाही”, “चाहत पांडेला पूर्ण पाठिंबा आहे”, “जबरदस्त चाहत”, “अतिआत्मविश्वासू करण”, अशाप्रकारच्या नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेच्या आईने ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांना दिलं खुलं आव्हान, २१ लाखांचं बक्षीस केलं जाहीर; का, कशासाठी? जाणून घ्या…

दरम्यान, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातून कशिश कपूर बाहेर झाली. त्यामुळे आता घरात फक्त ९ सदस्य बाकी राहिले आहेत. या सदस्यांमधून कोण-कोण महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader