‘बिग बॉस’ हिंदीचं १६वं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानला पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदवर शर्लिन चोप्रासह अनेक अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्याची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली होती. यावरून अनेक कलाकार त्याच्या विरोधात बोलत आहेत, तर काहींनी साजिदची बाजू घेत आपलं मत मांडलं आहे. आता अभिनेत्री पूमन पांडे आणि अभिनेता करणवीर बोहरा याने साजिदला पाठिंबा दर्शवत त्याला एक संधी देण्याची मागणी केली आहे.

आणखी वाचा : एका एपिसोडसाठी लाखाच्या घरात मानधन आकारणाऱ्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने केला रिक्षा प्रवास

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती

‘हॅशटॅग मीटू’ प्रकरणामुळे साजिदचा खरा चेहरा समोर आला असल्याचं काही अभिनेत्री सातत्याने बोलत आहेत. शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी सारख्या अभिनेत्रींनी साजिदवर लैगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. कामानिमित्त घरी बोलावून आपल्याबरोबर साजिदने गैरवर्तन केलं असल्याचं या अभिनेत्रींचं म्हणणं आहे. आता पूनम पांडे आणि करणवीर बोहराने साजिदला पाठिंबा दर्शवला आहे.

करणवीर आणि पूनम लवकरच ‘तेरे जिस्म से’ या गाण्यात एकत्र दिसणार आहेत. सध्या ती दोघे या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशाच एका प्रमोशन दरम्यान पूनम म्हणाली, “आम्ही प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी उभे असतो. मी स्वतः एक कलाकार आहे. त्यामुळे एखाद्या कलाकाराला आपण पाठिंबा देऊ शकत नाही? साजिद सरांवर अनेकजण नाराज आहेत. त्यांचं दुःख मी समजू शकते. त्या अभिनेत्रींबरोबर जे झालं त्याचं मला वाईट वाटतं. पण शक्य असल्यास साजिद सरांना एक संधी द्या. त्यांना माफ करा. आतापर्यंत ते अनेक कठीण प्रसंगांना समोरे गेले आहेत.”

तर साजिद खानबद्दल करणवीरनेही त्याचं मत मांडलं. तो म्हणाला, “मी साजिद खानला गेली अनेक वर्षं ओळखतोय. आपण प्रत्येकजण चुका करत असतो. पण आपण समोरच्याला माफ करायला शिकलं पाहिजे. कारण एखाद्याला क्षमा करणं ही सर्वात मोठी गोष्ट असते. प्रत्येकाला दुसरी संधी दिली गेली पाहिजे.”

हेही वाचा : “सोशल मीडियावर त्यांचे निर्वस्त्र…”, साजिद खानवर आरोप करणाऱ्या अभिनेत्रींबद्दल राखी सावंतने व्यक्त केला संताप

दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली. ‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान ‘हाऊसफुल ४’मधून पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला.

Story img Loader