लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड तिच्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते. आजवर तिने अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. कार्तिकीला बालपणापासून गाण्याची आवड होती. घरातूनच तिला गाण्याचं बाळकडू मिळालं आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेल्या कार्तिकीचे वडिलही गायक आहेत.
कार्तिकीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. कार्तिकीचे वडील पंडित कल्याणजी गायकवाड हे गायक व संगीतकार आहेत. कार्तिकीच्या वडिलांचा महाराष्ट्र शासनाकडून विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘मानाचा कंठ संगीत’ पुरस्कार पंडित कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला आहे.
हेही वाचा>> सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीकडून रिया चक्रवर्तीचा ‘वेश्या’ म्हणून उल्लेख? ‘ते’ ट्वीट व्हायरल
हेही वाचा>> उर्फी जावेदबाबत महिला नेत्याची प्रतिक्रिया, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तिचे कपडे…”
कार्तिकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडीओला तिने “महाराष्ट्र शासनाचा ‘मानाचा कंठ संगीत’ हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री मा.श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते पं कल्याणजी गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. पं कल्याणजी गायकवाड यांच्या संपूर्ण शिष्य परिवारातर्फे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचे खूप मनापासून आभार,” असं कॅप्शन दिलं आहे. कार्तिकीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनंदन केलं आहे.