‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून तिला ओळखलं जातं. सिनेविश्वातील अनेक प्रसिद्ध गाण्यांना कार्तिकीने आवाज दिला आहे. वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. आता लवकरच प्रेक्षकांची ही लाडकी गायिका आई होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
कार्तिकी गायकवाडच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गायिकेच्या डोहाळे जेवणाची खास झलक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. कुणीतरी येणार येणार गं! असा संदेश लिहिलेली भव्य रांगोळी, कार्तिकीची नवऱ्यासह ग्रॅन्ड एन्ट्री व अन्य कुटुंबीयांची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणच्या मेहंदीची चर्चा! हातावरच्या ‘त्या’ नावाने वेधलं लक्ष; मालिकेशी आहे कनेक्शन
डोहाळे जेवणासाठी गायिकने खास लूक केला होता. हिरव्या रंगाच्या साडीवर तिने हलव्याचे दागिने परिधान केले होते. fillamwala या इन्स्टाग्राम पेजवरून तिच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : पाठकबाईंनी सासऱ्यांबरोबर शेअर केला खास फोटो, तर हार्दिक जोशीने वडिलांना भेट दिली आलिशान गाडी, म्हणाला…
दरम्यान, कार्तिकीचा चाहता वर्ग मोठा आहे. कार्तिकी आणि रोनित नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता लवकरच या जोडप्याच्या घरी बाळाचं आगमन होणार आहे. सध्या गायिकेचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. गायिकेच्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर रोनित पिसे हा व्यावसायिक असून पुण्याचा राहणारा आहे.