Kashmera Shah Krushna Abhishek Love Story : प्रसिद्ध कॉमेडियन व गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक खूप लोकप्रिय अभिनेता आहे. कृष्णाच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. कृष्णाची पत्नी कश्मीरा शाह हिनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझे प्रेम, माझे कुटुंब, माझं सगळं काही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या १८ वर्षांपासून तू माझा सर्वात मोठा आधार आहेस. मी नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तू आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. माझा रॉकस्टार, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असं कश्मीराने कृष्णाचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे. कृष्णाच्या वाढदिवसानिमित्त त्याची व कश्मीराची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

“ती उत्तम अभिनेत्री आहे, पण…”; कंगना राणौतला ‘पंचायत’च्या प्रल्हादचा यांचा टोला, म्हणाले, “तिची बहीण रंगोली मला…”

कश्मीराचा पहिला घटस्फोट अन् कृष्णाशी लग्न

कश्मीराने २००१ मध्ये अमेरिकन उद्योगपती ब्रॅड लिस्टरमनशी लग्न केलं होतं, पण सहा वर्षांनी २००७ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर कश्मीरा व कृष्णाची भेट झाली. दोघे बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते, मग ते प्रेमात पडले. काही वर्षे लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर त्यांनी २०१३ साली लग्न केलं.

“तिने सगळ्या मर्यादा ओलांडल्या”, दलजीतने केलेल्या आरोपांवर दुसऱ्या पतीने सोडलं मौन; म्हणाला, “तिचा मुलगा…”

कश्मीरा व कृष्णाच्या वयातील अंतर

कश्मीरा ही कृष्णा अभिषेकपेक्षा वयाने मोठी आहे. दोघांच्या वयात ११ वर्षांचे अंतर आहे. कृष्णा ४१ वर्षांचा आहे, तर कश्मीरा ५२ वर्षांची आहे. हे दोघेही आता जवळपास १८ वर्षांपासून एकत्र आहेत. त्यांच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत.

आई होऊ शकली नाही कश्मीरा

कश्मीरा शाहने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिने सुमारे तीन वर्षे गरोदर राहण्यासाठी प्रयत्न केले होते, पण आयव्हीएफ प्रक्रियेदरम्यान तिच्या शरीरावर खूप परिणाम झाला. तिची प्रकृती बिघडली होती. “१४ वेळा माझी प्रेग्नेन्सी फेल झाली. आयव्हीएफ इंजेक्शन्समुळे खरोखरच आई झाल्यासारखं वाटतं. मूड बदलतो, वजन वाढतो आणि इतर अनेक शारीरिक बदल होतात,” असं ती म्हणाली होती. इतकं होऊनही ती आयव्हीएफने आई होऊ शकली नाही.

एकेकाळी आमिर खानचा बॉडीगार्ड होता ‘हा’ अभिनेता, बारटेंडर म्हणूनही केलं काम, आता…

कश्मीरा शाहने सरोगसीच्या मदतीने झाली आई

काश्मीराने गरोदर होण्याचे सर्व प्रयत्न अपयशी झाल्यानंतर आई होण्यासाठी सरोगसीचा मार्ग स्वीकारला. तेव्हा अनेकांनी तिच्यावर खूप टीका केली. तिची फिगर खराब होऊ नये म्हणून तिने सरोगसीचा मार्ग निवडला असंही म्हटलं गेलं, पण ते खरं नव्हतं. आयव्हीएफ प्रक्रियेमुळे तिच्या शरीरावर खूप परिणाम झाला. नंतर कृष्णा व कश्मीरा सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांचे आई- वडील झाले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashmira shah krushna abhishek age gap love story hrc