अभिनेत्री कतरिना कैफ ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गेल्या वर्षी तिचे विकी कौशलबरोबर लग्न झाले. आता लग्नानंतर ती पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहे. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कतरिनाने छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ या लोकप्रिय कार्यक्रमात लावणार आहे. तिथे तिने तिच्या फिटनेसचे रहस्य उघड केले आहे.

आणखी वाचा : KBC 14: अंदाजे उत्तरं देत गाठला ७५ लाखांचा टप्पा, पण प्रश्नाचं अचूक उत्तर माहित असताना स्पर्धकाने सोडला खेळ, नेमकं काय घडलं?

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही काही वर्षांपूर्वी भारतात मनोरंजन क्षेत्रात आपले नशीब आजमावण्यासाठी आली. इथे तिने केलेला प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आणि आता लग्नानंतर ती एका पंजाबी कुटुंबाचा भाग बनली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्माने कतरिनाला “लग्नानंतर एका पंजाबी कुटुंबाचा भाग बनल्यावर तिचा आहार बदलला आहे का?”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने तिचे लग्नानंतरच्या काही कौटुंबिक गोष्टींचा खुलासा केला.

या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “सुरुवातीला माझ्या सासूबाई मला पराठे खायला खूप आग्रह करायच्या. पण मी डाएटवर असल्याने मी ते खाऊ शकत नव्हते. तरी त्यांच्या आग्रहाला मान देण्यासाठी मी पराठ्याचा एक तुकडा खायचे. आता मी डाएटवर असल्याचे समजल्यानंतर त्या माझ्यासाठी रताळे शिजवतात.”

हेही वाचा : Bigg Boss 16: ‘बिग बॉस’च्या घरात येणार नवा ट्विस्ट, होणार कतरिना कैफची एंट्री आणि…

कतरिना कैफसोबत ‘फोन भूत’मधील सहकलाकर ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही या कार्यक्रमात सहभागी झाले. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader