सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. या घरात रोजच काही ना काही घडामोडी घडत असतात आणि आठवड्याच्या शेवटी सलमान खान या घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. परंतु हा सिझन सुरु झाल्यावर काही दिवसातच सलमानला डेंग्यू झाला. त्यामुळे त्याच्या जागी ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची धुरा करण जोहरने सांभाळली. पण आता लवकरच या कार्यक्रमात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफची ‘बिग बॉस’च्या घरात एंट्री होणार आहे.

आणखी वाचा : कार्तिक आर्यनचा ‘हा’ आगामी चित्रपट थिएटरमध्ये नाही तर, थेट प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

हा शनिवार – रविवार ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. याची दोन कारणे आहेत; पहिलं कारण म्हणजे सलमान खान आता डेंग्यूतून बरा झाला असून तो या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत परतणार आहे. तर दुसरे कारण म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ ही ‘बिग बॉस’च्या घरात अवतरणार आहे.

कतरिना या कार्यक्रमात येणार असल्याने चाहत्यांना कतरिना आणि सलमान यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. कतरिना-विकीच्या लग्नानंतर पहिल्यांदाच सलमान आणि कतरिना एकत्र दिसणार आहेत. सध्या कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट ‘फोन भूत’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने कतरिना ‘बिग बॉस १६’मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे कतरिना आणि सलमानला एकत्र एका मंचावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्यानंतर अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर

यावेळी कतरिना कैफसोबत ‘फोन भूत’मधील सहकलाकर ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीही ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणार आहेत. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader