Kaumudi Walokar Haldi Ceremony : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच लग्नबंधनात अडणार आहे. मंगळवारी ( २४ डिसेंबर २०२४ ) रात्री मेहंदी सोहळा पार पडल्यावर आता अभिनेत्रीच्या हळदीला सुरुवात झाली आहे. हळदी समारंभाची लहानशी झलक अभिनेत्रीने व्हिडीओच्या रुपात इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालिकाविश्वातील बरेच कलाकार लग्नबंधनात अडकल्याचं पाहायला मिळालं. आता त्या कलाकारांच्या यादीत कौमुदीचं नाव जोडलं जाणार आहे. अभिनेत्रीचा साखरपुडा गेल्या वर्षीच्या अखेरीस पार पडला होता. कौमुदीच्या साखरपुड्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. आता सगळेजण अभिनेत्रीच्या विवाहसोहळ्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा : विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”

‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदीच्या हळदी समारंभाला सुरुवात

कौमुदीच्या ( Kaumudi Walokar ) मेहंदी समारंभाला ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील तिचे सहकलाकार सुद्धा उपस्थित आहेत. अश्विनी महांगडे, अभिषेक देशमुख त्याची पत्नी कृतिका देव आणि सुमंत ठाकरे यांनी कौमुदीच्या हाताला मेहंदी लागल्यावर सुंदर असं फोटोशूट केलं. आता अभिनेत्रीच्या हळदीची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आलेली आहे. याला अभिनेत्रीने ‘Haldified’ असं कॅप्शन दिलं आहे.

कौमुदीच्या कुटुंबीयांनी लाकडी जाळीवर सुंदर अशा फुलांची सजावट करून त्यावर आंब्याची पानं आणि दुसऱ्या भांड्यात हळद ठेवली होती. हळद लागताना अभिनेत्रीने फिकट जांभळ्या रंगाचा ड्रेस घातून त्यावर लाइट मेकअप केला होता. आता हळद लागल्यावर कौमुदी येत्या २ दिवसांत लग्न करेल असं स्पष्ट झालेलं आहे.

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”

हेही वाचा : केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

Kaumudi Walokar Haldi Ceremony
कौमुदीच्या लग्नासाठी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार ( Kaumudi Walokar Haldi Ceremony )

कौमुदीचा होणारा नवरा आहे तरी कोण?

दरम्यान, कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाश हा उच्चशिक्षित असून त्याने एज्युकेशन विषयात आपली पीएचडी पूर्ण केलेली आहे. तो ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. त्याने वेबसाइटवर अनेक ब्लॉग्ज देखील लिहिले आहेत. आता लवकरच कौमुदी ( Kaumudi Walokar ) आणि आकाश यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडणार आहे.

Story img Loader