Aai Kuthe Kay Karte Fame Actress Kaumudi Walokar : ग्रहमख, मेहंदी, हळद असे सगळे विधी झाल्यावर नुकताच ‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वलोकरचा संगीत सोहळा पार पडला आहे. अभिनेत्रीच्या संगीत सोहळ्याला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. इंडस्ट्रीतील तिच्या जवळच्या अनेक मित्र-मैत्रिणींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कौमुदीने तिच्या संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने यावेळी गोल्डन रंगाचा भरजरी असा सुंदर लेहेंगा घातला होता. तर, तिचा पती आकाश चौकसेने भरजरी वर्क असणारी शेरवानी घातली होती. सध्या कौमुदी आणि आकाशच्या संगीत सोहळ्याचे अनेक Inside व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कौमुदीला ( Kaumudi Walokar ) तिच्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच आकाश चौकसेने या संगीत सोहळ्यात फिल्मी स्टाइल प्रपोज केलं. याचा व्हिडीओ अभिनेत्री कृतिका देवने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यात आकाश कौमुदीला म्हणतो, “कौमुदी… या अखंड ताऱ्यांच्या साक्षीने आणि उद्या सकाळच्या सूर्य किरणांच्या साक्षीने… माझ्याशी लग्न करशील?” अर्थात, कौमुदीने ‘हो’ उत्तर दिल्यावर आकाशचा आनंद गगनात मावेनासा होतो.
आकाशने कौमुदीला केलं प्रपोज
कौमुदी ( Kaumudi Walokar ) आणि आकाश या सोहळ्यात अनेक बॉलीवूड गाण्यांवर थिरकले आहेत. एका व्हिडीओमध्ये ते हृतिकच्या ‘कहो ना प्यार है’ गाण्यावर डान्स करताना दिसतात. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये आकाश व कौमुदी ‘कल हो ना हो’ चित्रपटातल्या ‘प्रीटी वुमन’ गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री अश्विनी महांगडेने सुद्धा या दोघांच्या संगीत सोहळ्यात सुंदर असा डान्स केला आहे.
हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
कौमुदीचा होणारा नवरा आहे तरी कोण?
दरम्यान, कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे आहे. आकाश हा उच्चशिक्षित असून त्याने एज्युकेशन विषयात आपली पीएचडी पूर्ण केलेली आहे. तो ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतो. त्याने वेबसाइटवर अनेक ब्लॉग्ज देखील लिहिले आहेत. आता लवकरच कौमुदी ( Kaumudi Walokar ) आणि आकाश यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडणार आहे.