बॉलीवूड सुपस्टार अमिताभ बच्चन सतत चर्चेत असतात. अमिताभ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओच्या माध्यामातून ते चाहत्यांना अपडेट देत असतात. सध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या भागाचे सूत्रसंचालन करत आहे. यावेळी एका स्पर्धेकाशी चर्चा करत असताना अमिताभ यांनी त्यांना आवडणाऱ्य़ा अभिनेत्याच्या नावाचा खुलासा केला आहे.
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर पिंकी नावाची स्पर्धेक बसली होती. पिंकीला १२ लाख ५० हजार रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला होता की, दिलीप कुमार हे नाव धारण करण्यापूर्वी खालीलपैकी कोणते नाव युसुफ खान यांना दिले होते? पण पिंकिला या प्रश्नाचं उत्तर आलं नसल्यामुळे ती खेळ अर्धवट सोडते आणि ६ लाख ४० हजार रुपये घेऊन घरी जाते.
अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचं उत्तर देत एक किस्सा सांगितला आहे. बच्चन म्हणाले, दिलीप कुमार यांना एका चित्रपटात घेण्यात आले होते. पण बॉलीवूडमध्ये त्यांना त्यांच नाव बदलण्याचा सल्ला मिळाला होता. देविका राणी आणि भगवती चरण वर्मा यांनी त्यांना तीन नावं सूचवली होती. वासुदेव, दिलीप कुमार और जहांगीर. मात्र, त्यांनी दिलीप कुमार नावाची निवड केली. कालांतराने जेव्हा त्यांनी मुघले आझम चित्रपट केला तेव्हा त्यांनी साकारलेल्या पात्राचे नाव जहांगीर होते.
हेही वाचा-“माझे सासरे हयात असते तर…”; अभिनेता सुव्रत जोशीचं दिवंगत अभिनेते मोहन गोखलेंबाबतचं विधान चर्चेत
अमिताभ म्हणाले, “मी दिलीप कुमार यांचा सगळ्यात मोठा चाहता आहे. जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो दिलीप कुमार यांच्याअगोदर आणि दिलीप कुमार यांच्यानंतर असा लिहला जाईल. ते एक अनोखे कलाकार होते.”