Kaun Banega Crorepati 16: ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे. १५ यशस्वी सीझननंतर लवकरच या शोचे १६ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळीही हा शो महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करणार आहेत. या शोचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अनेकांना या शोमध्ये सहभागी व्हायचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तुम्हालाही या शोमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याची नोंदणी (Kaun Banega Crorepati 16 Registration Process) प्रक्रिया कशी असते ते जाणून घ्या.
‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये सहभागी कसे व्हायचे?
‘कौन बनेगा करोडपती सीझन १६’ चे प्रिमियर पुढच्या महिन्यात १२ ऑगस्ट रोजी होईल. या सीझनची टॅगलाईन ‘जिंदगी है, हर मोड़ पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा,’ अशी आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ १५ पर्वांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे व स्पर्धकांना करोडपती करत आहे. या शोमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर बसायची संधी मिळवण्यासाठी काय करावं लागेल, याबाबत अनेकांना जाणून घ्यायचं असतं. चला तर नोंदणीची प्रक्रिया जाणून घेऊ.
अमिताभ, जया व रेखा लाँग ड्राइव्हवर जायचे एकत्र; ‘ते’ दोघेही पुढच्या सीटवर बसायचे अन् मागे…
केबीसीची नोंदणी प्रक्रिया
- ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल.
- यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करावे लागेल.
- क्विझची उत्तरं दिल्यानंतर जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण करावी लागेल.
- यानंतर तुमच्या स्क्रीनवर ‘Registration Confirm’ असं लिहिलेलं दिसेल.
अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम आहे का? मुलाखतीत थेट विचारलेल्या प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या…
मेसेजद्वारे होऊ शकता सहभागी
KBC 16 SMS Registration: तुम्ही एसएमएसद्वारे ‘कौन बनेगा करोडपती १६’ साठी नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन KBC लिहा. त्यानंतर स्पेस देऊन नोंदणीसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शनमध्ये द्या. मग तुमचे वय आणि लिंग लिहा व हा मेसेज 509093 वर पाठवा. याशिवाय सोनी लिव्हच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता. एबीपी लाइव्हने याबद्दल वृत्त दिले आहे.
तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जर तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमची तुमची निवड केली जाईल. त्यानंतर पुढच्या राउंडमध्ये जाण्यासाठी ११ जणांची निवड केली जाईल. या ११ लोकांना फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला जाईल, जो कमीत कमी वेळेत अचूक उत्तर देईल त्याला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर हॉट सीटवर बसून हा खेळ खेळण्याची संधी मिळेल.