‘कौन बनेगा करोडपती १४’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये स्पर्धक बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन लाखो रुपये जिंकतात. एक कोटी रुपयांची रक्कमही काही स्पर्धक मिळवतात. हा शो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवतो. काही स्पर्धक आपली काही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शोमध्ये सहभागी होतात. असाच एक स्पर्धक ‘केबीसी’च्या नव्या भागामध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांनाही त्याच्या ज्ञानाने आश्चर्यचकित केले.

आणखी वाचा : दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशन यांच्या ‘फायटर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘कौन बनेगा करोडपती १४’ च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये जालंधर येथे राहणारे पशुवैद्य रोहित गुप्ता हॉटसीटवर बसले होते. रोहित गुप्ताने अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय चोखपणे दिली. विशेष म्हणजे त्यांच्या तिन्ही लाईफ लाईन्स ३ लाख २० हजारच्या प्रश्नपर्यंत संपल्या. पण त्यानंतर त्याने अंदाजे उत्तरं देत थेट ७५ लाखांचा टप्पा गाठला. हे पाहून बिग बीदेखील त्याचे चाहते झाले. मात्र ७५ लाखांचे उत्तर माहित असूनही त्याने खेळ तिथेच सोडला.

रोहितने ५० लाख रुपायांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आणि तो ७५ लाखाच्या प्राश्नावर येऊन पोहोचल. पण यावेळी मात्र तो प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी बुचकळ्यात पडला. ७५ लाखांसाठी अमिताभ बच्चन यांनी “ऑलिम्पिक स्पर्धा जिंकणारी पहिली अमेरिकन महिला कोणत्या भारतीय शहरात जन्मली?” असा प्रश्न त्याला विचारला. या प्रश्नासाठी त्याला चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता हे पर्याय देण्यात आले. रोहित गुप्ताला या प्रश्नाचे उत्तर माहित होतं, पण तो थोडा गोंधळला होता.

हेही वाचा : प्रार्थना बेहरेने अमिताभ बच्चन यांना विचारला होता चुकीचा प्रश्न; म्हणाली, “१६ वर्षीय मुलीवर प्रेम…”

त्याच्या तिन्ही लाईफ लाईन्स संपल्या होत्या आणि उत्तर चुकल्यास मोठं नुकसान होईल म्हणून त्याने कोणताही धोका न पत्करता खेळ सोडला. जाता जाता अमिताभ बच्चन यांनी रोहितला या प्रश्नाचे अंदाजे उत्तर देण्यास सांगितलं आणि त्याने ‘कोलकाता’ असं उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर बरोबर होतं. अमिताभ बच्चन यांनाही प्रश्न पडला की, त्याला योग्य उत्तर माहित असताना त्यांनी उत्तर का दिले नाही. मात्र, अखेर ५० लाख रुपये घेऊन रोहितला या शोमधून बाहेर पडावं लागलं.

Story img Loader