‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या १५ व्या पर्वाला १४ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात करण्यात आली होती. या सीझनचा शेवटचा एपिसोड २९ डिसेंबर रोजी प्रसारित झाला. १५ वा सीझन संपताना ‘बिग बी’ भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. या शेवटच्या भागात ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री शर्मिला टागोर, विद्या बालन आणि सारा अली खान सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या भागात प्रेक्षकांना अनेक जुने व रंजन किस्से ऐकायला मिळाले. पण, या पर्वाचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा अमिताभ बच्चन भावुक झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या सीझनचा पहिला प्रोमो १८ एप्रिल २०२३ रोजी लॉन्च करण्यात आला होता. यानंतर ऑगस्टमध्ये या पर्वाची सुरूवात करण्यात आली होती. जवळपास ४ महिने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता या सीझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अमिताभ यांनी यंदाच्या केबीसीमध्ये स्पर्धकांबरोबर अनेक किस्से, आठवणी व करिअरमधील मजेशीर प्रसंग शेअर केले.

हेही वाचा : Video : ‘ओले आले’चा नेमका अर्थ काय? कलाकारांनीच केला खुलासा, पाहा विशेष मुलाखत

१५ व्या सीझनची सांगता करताना अमिताभ म्हणाले, “माझ्या प्रिय मित्रांनो, सांगताना अतिशय जड जातंय पण, उद्यापासून आपली भेट होणार नाही. उद्यापासून हा रंगमंच सजणार नाही. अलविदा प्रेक्षकहो…हे सांगण्याची माझ्यात हिंमत नव्हती पण, आज या मंचावरून शेवटचं म्हणतोय…शुभ रात्री शुभ रात्री.” प्रेक्षकांना निरोप देताना अमिताभ यांचा कंठ दाटून आला होता.

हेही वाचा : वर्षअखेरीस जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ने मारली बाजी! टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ आहेत टॉप १० मालिका, पाहा संपूर्ण यादी

अमिताभ यांच्या भाषणानंतर प्रेक्षकांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एक प्रेक्षक महिला म्हणते, “आमच्यापैकी देव कोणीही पाहिला नाही…पण आम्ही देवाच्या सर्वात आवडत्या व्यक्तीला भेटलो.” सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी लवकरात लवकर ‘केबीसी’चं पुढचं पर्व सुरू करण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaun banega crorepati season 15 amitabh bachchan emotional goodbye to audience video viral sva 00