बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन दरवर्षी सुपरहिट शो ‘कौन बनेगा करोडपती’मधून छोट्या पडद्यावर दिसतात. गेल्या २३ वर्षांपासून हा शो अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. फक्त या शोचं तिसरे पर्व सोडलं, तर इतर सर्व पर्व बच्चन यांनी होस्ट केली आहेत. आता ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वासाठी चाहते अधिक उत्सुक आहेत. या पर्वाचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमधून यंदाच्या पर्वात मोठे बदल होणार असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा – “दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं, नाही का?” कुशल बद्रिकेची पोस्ट; म्हणाला, “वारकरी नुसतं कळसाच्या पाया पडून…”
‘कौन बनेगा करोडपती १५’च्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन सुरुवातीला सर्व काही बदलत असल्याचं म्हणत आहेत. त्यानंतर एक वर्किंग महिला आपलं काम करत दुसऱ्या बाजूला आपल्या मुलाचा फुटबॉल सराव घेताना दिसत आहे. मग एक मुलगा ट्रॅफिकमध्ये वस्तू विकत असताना ग्राहकाकडून पैसे घेण्याऐवजी हातावरचा क्यूआर कोडचा टॅटू दाखवताना पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरील एन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर्स आणि छोट्या व्यावसायिकाबद्दल बिग बी बोलताना दिसत आहेत. तसंच आजकाल लोक मोबाईलच्या एका क्लिकवर कशा प्रकारे चविष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतात आणि त्यामुळे कुटुंबं कशी जवळ आली आहेत, हेदेखील बिग बी सांगत आहेत.
हेही वाचा – ‘बिग बॉस ओटीटी २’मधून बाहेर येताच आलिया सिद्दिकीचा सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यानं…”
प्रोमोच्या शेवटी अमिताभ बच्चन म्हणतात, “जेव्हा एखादा देश बदलतो आणि विकसित होतो, तेव्हा ते प्रगतीकडे वाढचाल करण्याचे लक्षण असते. ज्याप्रमाणे भारत बदलत आहे, त्याप्रमाणे आता ‘कौन बनेगा करोपडती’ही बदलत आहे,” असं त्यांनी जाहीर केलं आहे.
हेही वाचा – …जेव्हा धर्मेंद्र यांनी दारुच्या नशेत धरली होती आपल्याच वडिलांची कॉलर; शिव्या देत म्हणाले होते…
‘कौन बनेगा करोडपती १५’साठीची नोंदणी एप्रिलपासून सुरू झाली आहे. माहितीनुसार- या पर्वाचं शूटिंग पुढील महिन्यापासून सुरू होणार असून, ऑगस्टमध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘कौन बनेगा करोडपती’चं पहिलं पर्व २००० साली प्रसारित झालं होतं. तेव्हापासून प्रेक्षकांच्या आवडत्या शोंच्या यादीत ‘कौन बनेगा करोडपती’ पहिल्या नंबरवर आहे. या शोचं फक्त तिसरं पर्व शाहरुख खाननं होस्ट केलं होतं. बाकी सर्व पर्व अमिताभ बच्चन आपल्या अंदाजात होस्ट करत आहेत.