‘कौन बनेगा करोडपती’चं सध्या १६वं पर्व सुरू आहे. या कार्यक्रमात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्यामधील गोष्टी मोकळेपणाने सांगतात. अलीकडेच त्यांच्या समोर हॉटसीटवर ‘इंडिया चॅलेंजर वीक’ची स्पर्धेक प्रियांका बसली होती; जी मध्यमवर्गीय कुटुंबात आली आहे. यावेळी तिने अमिताभ बच्चन यांना काही हटके प्रश्न विचारले.

सर्वात आधी प्रियांकाने अमिताभ बच्चन यांना विचारले की, तुमचं घर इतकं मोठं आहे. जर रिमोट हरवला तर मग तुम्ही कसे शोधता? तर बिग बी म्हणाले, “सरळ सेट-टॉप बॉक्स जवळ जाऊन तिथून टीव्ही चालू करतो किंवा कंट्रोल करतो.” त्यानंतर प्रियांका म्हणाली, “सर मध्यमवर्गीय कुटुंबात जर रिमोट हरवला तर वाद होतात. तर तुमच्या घरी असे वाद होतं नाहीत का?” तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले की, नाही, देवीजी. आमच्या घरी असं होतं नाही. बेटवर दोन उशा असतात तिथेच रिमोट असतो. तेवढंच शोधावं लागतं.

हेही वाचा – Bigg Boss 18: आठवड्याभराच रेशन गमावून चुम दरांग झाली ‘टाइम गॉड’, पण अवघ्या काही तासांत ‘बिग बॉस’ने पदावरून केली हकालपट्टी

पुढे प्रियांकाने विचारलं की, जेव्हा मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा आई मला कोथिंबीर वगैरे आण असं सांगते. तसंच जया मॅम तुम्हालाही अशाप्रकारे गोष्टी आणायला सांगतात का? यावर अमिताभ बच्चन म्हणतात, “हो, सांगते की, तुम्ही तुम्हालाच घरी नीट घेऊन या.” मग प्रियांकाने शेवटचा प्रश्न विचारला, “सर, तुम्ही कधी एटीएममधून पैसे काढले आहेत का? आणि तुमचा उर्वरित बॅलेस चेक केला आहे का? या प्रश्नाच उत्तर देत बिग बी म्हणतात की, ना मी कधी स्वतः जवळ पैसे ठेवतो, ना कधी एटीएममध्ये गेलो आहे. कारण मला ते कसं करतात हेच कळत नाही. पण जया यांच्या जवळ पैसे असतात. त्यामुळे मी त्यांच्याकडून पैसे मागून घेतो.

हेही वाचा – केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, “जया यांना गजरा खूप आवडतो. जेव्हा रस्त्यामध्ये छोटी मुलं हार विकायला येतात. तेव्हा मी त्यांच्याकडून खरेदी करतो आणि मग तो हार, गजरा जया यांना देतो किंवा गाडीमध्ये ठेवतो. कारण फुलांचा सुगंध खूप चांगला येतो.”

Story img Loader