‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम देशभरात पाहिला जातो. १५ वा सीझन संपल्यानंतर जवळजवळ आठ महिन्यांनंतर १६ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १२ ऑगस्ट २०२४ ला १६ व्या पर्वाचा पहिला भाग ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षानुवर्षे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. याबद्दल बोलताना बीग बी यांनी म्हटले, ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम एका खेळापेक्षा जास्त आहे. जो व्यक्ती हा खेळ खेळण्यासाठी समोरच्या खुर्चीवर बसलेला असतो, त्याच्या स्वप्न आणि आशा-आकांक्षेचा प्रवास असतो. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे सूत्रसंचालन करताना मी माझ्या चाहत्यांशी जोडलेला राहतो. हे चाहते म्हणजे माझे विस्तारित कुटुंब आहे.”
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या कार्यक्रमाच्या १६ व्या सीझनमध्ये आधुनिक भारताचे प्रतिबिंब आढळेल. ज्ञानाची पातळी वाढवणारा म्हणून आपण हा सीझन साजरा करणार आहोत. हा कार्यक्रम पाहताना दर्शकांना उत्तम अनुभव येईल असे त्यांनी म्हटले आहे. अशी माहिती न्यूज एजन्सी ‘आयएएनएस’ ने दिली आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Rizwan Sajan Success Story
Success Story: १६ व्या वर्षी उदरनिर्वाहासाठी विकले दूध, आता आहेत दुबईतील सर्वात श्रीमंत भारतीय
shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”
baba siddque and sitharam yechury
Year Ender 2024 : सीताराम येचुरी ते बाबा सिद्दिकी, ‘या’ भारतीय राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला अखेरचा श्वास!
madhuri dixit husband dr shriram nene asked to pose solo at event
मिस्टर अँड मिसेस नेनेंचा डॅशिंग लूक! माधुरी दीक्षितसाठी पतीने केलं असं काही…; ‘त्या’ कृतीचं सर्वत्र होतंय कौतुक
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : “छगन भुजबळांची समजूत कशामुळे काढायची?”, माणिकराव कोकाटे यांचा सवाल

‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझन १६ मध्ये काय नवीन असणार?

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या पर्वात काही नवीन गोष्टींचा समावेश केला आहे. ‘सुपर ट्विस्ट’ हा सेगमेंट या पर्वात पाहायला मिळणार आहे. याबरोबरच, ‘दुग्नास्त्र’ या संकल्पनेचादेखील समावेश केला आहे. याचाच अर्थ स्पर्धकाने जिंकलेली रक्कम ही दुप्पट होणार आहे.

‘सुपर सवाल’ या संकल्पनेचादेखील या पर्वात समावेश केला आहे. जेव्हा स्पर्धक यशस्वीरित्या पहिल्या पाच प्रश्नांची उत्तरे देईल, तेव्हा त्याला सुपर सवाल हा बोनस प्रश्न विचारण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे, या प्रश्नासाठी स्पर्धकापुढे कोणतेही पर्याय नसतील आणि कोणतीही लाइफलाइनदेखील वापरता येणार नाही.

हेही वाचा: Bigg Boss Marathi : अंकिता, धनंजय यांना अजूनही अभिजीत सावंतवर आहे डाउट, गॉसिप करताना म्हणाले, “आपलंच नाणं खोटं…”

जर स्पर्धकाने या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर त्याला ‘दुग्नास्त्र’ चा वापर करता येणार आहे. या दुग्नास्त्राचा वापर करून खेळाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच प्रश्नक्रमांक सहा ते प्रश्नक्रमांक दहा यामध्ये एका विशिष्ट प्रश्नाची रक्कम दुप्पट करू शकतात. जर हे यशस्वी झाले, तर खेळाच्या शेवटी ही बोनस रक्कम जिंकलेल्या रकमेत जोडली जाईल.

दरम्यान, ३ जुलै २००० मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’चे पहिले पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या सीझनपासून अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करत आहेत. आता या पर्वामध्ये अनेक गोष्टी बदलल्याने केबीसीच्या खेळात काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader