टीव्ही अभिनेते ईश्वर ठाकूर आजारी आहेत, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या आजारपणाबद्दल बातम्या येत आहेत. तसेच ते आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या मदतीसाठी इंडस्ट्रीतील अनेक लोक पुढे आले आहेत. अशातच ‘एफआयआर’ मालिकेतील त्यांची सह-कलाकार चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकनेही ईश्वर यांच्यासाठी क्राउड फंडिंग सुरू केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरातील लोक जमेल तशी रक्कम पाठवून ईश्वर ठाकूर यांना मदत करत आहेत. आपल्याला ऑनलाइन पेमेंट अॅपवर १०, २०, ५० रुपये अशी मदत येत आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे आपल्याजवळ २० हजार रुपये जमा झाले आहेत, असं ईश्वर ठाकूर यांनी सांगितलं. तसेच त्यांनी मदत करणाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

“लघुशंकेवर नियंत्रण नाही, डायपरसाठी पैसे नसल्यामुळे कागद…”, प्रसिद्ध अभिनेता करतोय गंभीर आजाराशी सामना

दरम्यान, ‘आज तक’शी बोलताना अभिनेत्री कविता कौशिक म्हणाली, “एफआयआर मालिकेपासून मी ईश्वर यांना ओळखते. ते आर्थिक संकटांचा सामना करत होते, त्यामुळे त्यांना आमच्या मालिकेत घेण्यात आलं होतं. त्यांची परिस्थिती खूप हलाखीची आहे. त्याचा भाऊ मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि कुटुंबही आर्थिकदृष्ट्या खूपच कमकुवत आहे. त्यांना रोज शूटिंगची संधी मिळावी यासाठी संपूर्ण टीमचा प्रयत्न होता. त्यामुळेच त्यांना कॉन्स्टेबल गोलूची भूमिका देण्यात आली होती. ईश्वर कामात थोडे संथ होते, कधी कधी त्यांना डायलॉग्सही बोलता येत नव्हते, पण त्यानुसारच त्यांची भूमिका तयार करण्यात आली होती. त्याचं संपूर्ण श्रेय आमच्या दिग्दर्शकाला जातं. आम्हाला त्यांच्या परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे मालिका सुरू असतानाही आम्ही मदत करत होतो. आता शो बंद होऊन सात-आठ वर्षे झाली आहेत, त्यामुळे संपर्क तुटला होता. लॉकडाऊन दरम्यान मला ईश्‍वरचा फोन आला होता, तेव्हाही आम्ही त्यांना मदत केली होती,” असं कविताने सांगितलं.

चित्रा वाघ म्हणाल्या “थोबडवून काढेन,” उर्फीने Instagram ला दिल्ली अपघाताचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाली “तुमच्या पक्षाशी…”

पुढे ती म्हणाली, “आता पुन्हा एकदा त्यांच्या प्रकृतीबद्दल कळालं. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे मी टीमशी बोलले. कारण माझी वैयक्तिक मदत कमी पडली असती. मग जेडी मजेठिया, बिनाफर कोहली यांच्या मदतीने मी त्यांच्यासाठी ५० हजार रुपये जमा करून त्यांना दिले. तसेच मी क्राउड फंडिंग देखील सुरू केलंय, जेणेकरून त्यांना मूलभूत गोष्टींची गरज भागवता येईल. लोक मदत करत आहेत आणि आमचेही प्रयत्न सुरू आहेत. मी माझ्या सोशल मीडियावरून लोकांना मदतीसाठी आवाहन करत आहेत. त्यांचे उपचार मुलभूत गरजा पूर्ण होतील, इतकी मदत झाली तरी ती पुरेशी असेल,” असं कविताने सांगितलं.