‘चार दिवस सासूचे’, ‘राधा प्रेम रंगे रंगली’, ‘उंच माझा झोका’ अशा मालिकांतून, तसेच विविध धाटणीच्या नाटक व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे कविता मेढेकर(Kavita Medhekar) होय. सध्या त्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत भुवनेश्वरीची भूमिका साकारताना दिसत आहेत. त्या सकारात्मक भूमिकांतून घराघरांत पोहोचल्या. त्याचप्रमाणे आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत त्या साकारत असलेल्या भुवनेश्वरीच्या नकारात्मक भूमिकेलादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. आता त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या अभिनय क्षेत्रात कशा आल्या, वडिलांनी त्यांना काय सांगितले होते, याबद्दल कविता मेढेकर यांनी खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाल्या कविता मेढेकर?

अभिनेत्री कविता मेढेकर यांनी नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाविषयीची माहिती देताना सांगितले, “मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की, मला नाटकात काम करायचं आहे. त्यावेळी माझ्या बाबांचं सरळ, स्पष्ट मत होतं की, चांगल्या घरातील मुली नाटक, सिनेमा यांत काम करीत नाही. माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते, वर्चस्व गाजवणारे होते, असंही काही नव्हतं. त्याही वेळेस मला कळत होतं की, ते जे बोलत आहेत ते सगळं माझ्या काळजीपोटी आहे. पण, मी तुम्ही म्हणताय तरीपण मी काम करणार, बंडखोर होऊन करणार, असंही काही नव्हतं. माझं असं होतं की, नाटकात काम करण्याची संधी मिळतेय, करू का? बाबा नाही म्हटले आणि मी ठीक आहे, असे म्हटले.”

“पुढे असं झालं की, मला सुदैवानं चांगली संधी मिळाली. ‘सुंदर मी होणार’सारख्या नाटकात मला काम करण्याची संधी मिळाली. पु ल देशपांडे यांच्या पंचाहत्तरीसाठी आम्ही नाटक केलं. या नाटकाचा प्रयोग वडिलांनी पाहिला होता. डॉक्टर श्रीराम लागू, वंदना गुप्ते, डॉक्टर गिरीश ओक, रवी पटवर्धन या सगळ्या कलाकारांबरोबर आपली मुलगी एका नाटकात काम करतेय. ते पाहिल्यानंतर वडिलांना असं वाटलं की, हे छान आहे आणि त्यांना कुठेतरी हे जाणवलं होतं की, ही माझी आवड आहे अन् हे मला कुठेतरी येतंय. मग मी पुढच्या वेळेस त्यांना विचारलं. त्यांना म्हटलं की, मला नाटक करायचंय, तर काय करू? मला ते म्हणाले की, हे बघ ठीक आहे की, तू चांगलं काम करतेस, सगळं बरोबर आहे. करायचंच असेल तर कर; पण दोन गोष्टी पाळ. एक तुझा पोर्टफोलिओ घेऊन, तू कोणाच्याही ऑफिसमध्ये जायचं नाही. मी विचार केला, तसं असेल तर माझं करिअर कसं होणार. पण बाबा म्हणत आहेत, तर ठीक आहे. दुसरं सिगरेट आणि दारू प्यायची नाही. मी त्यांना ठीक आहे, असं म्हटलं होतं. मी खूप नशीबवान होते. तसं न करताही माझं करिअर झालं.”

“आज मी दोन मुलांची आई आहे. आज विचार करताना वाटतं की, माझे वडील कुठल्या काळजीपोटी ते बोलत होते, हे समजू शकते. त्या वेळी मी त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता की, बाबा म्हणत आहेत ना मग ठीक आहे. तर मला असं वाटतं की, आपल्या मुलांनीदेखील असा डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. कारण- त्याची मदत होते. ते त्यांच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी सांगत असतात. कदाचित आपल्याला त्यावेळी ते पटत नसतं, समजतही नसतं. पण, त्याचा काहीतरी अर्थ असतो. तर मी काही पोर्टफोलिओ केला नाही. माझ्या नशिबानं मला चांगली संधी मिळत गेली, चांगले दिग्दर्शक मिळत गेले.”

हेही वाचा: भुवनेश्वरीमुळे मोडणार लाडक्या लेकाचा संसार? अक्षरा-अधिपतीमध्ये टोकाचे वाद; मास्तरीणबाईने सांगितला ‘तो’ निर्णय, पाहा प्रोमो

दरम्यान, कविता मेढेकर या त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात. सध्या त्यांची भुवनेश्वरी ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.