शिवानी रांगोळे सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका आणि शिवानीचं काम अल्पावधीतच प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. तर या मालिकेत अभिनेत्री कविता मेढेकर ‘भुवनेश्वरी’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. तर आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त कविता मेढेकर यांनी एक पोस्ट शेअर करत त्या दोघींमधील ऑफस्क्रीन बॉण्डिंग सर्वांसमोर आणलं आहे.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी रांगोळे हिचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे चाहते आणि मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळी सोशल मीडियावरून तिला विविध पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री कविता मेढेकर यांनी देखील शिवानीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या मालिकेत कविता मेढेकर शिवानीचा छळ करताना दिसतात. पण खऱ्या आयुष्यात त्या दोघींचं नातं कसं आहे हे त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे.
त्या दोघींचे फोटो शेअर सोशल मीडियावर शेअर करत कविता मेढेकर यांनी लिहिलं, “स्क्रीनवर मी तुझ्याशी कितीही वाईट वागले तरीही तुला माहितीये प्रत्यक्ष आयुष्यात आय लव्ह यू! तू आहेस तशीच शहाणी मुलगी राहा, फोकस्ड राहा, आनंदी राहा!! आणि लेट्स रॉक ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’…हॅपी बर्थडे शिवानी!”
तर आता कविता मेढेकर यांच्या या पोस्टनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानीने देखील या पोस्टवर कमेंट करत कविता मेढेकर यांचे आभार मानत त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. शिवानीने या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, “मला माहीत आहे. आय लव्ह यु टू!!” तर आता कविता मेढेकर यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.