अभिनेत्री कविता लाड-मेढेकर या मराठी मनोरंजन सृष्टीतील बहुआयामी अभिनेत्रींपैकी एक. सध्या त्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील ‘भुवनेश्वरी’ या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. या भूमिकेसाठी त्यांना झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा हे पुरस्कार मिळाले. त्याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
कालच ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. यामध्ये ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने बाजी मारलेली दिसली. या मालिकेसाठी कविता मेढेकर यांना सर्वोत्कृष्ट खलनायिका आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा हे पुरस्कार मिळाले. आता एक पोस्ट शेअर करत त्यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत त्यांनी लिहिलं, “सर्वोत्कृष्ट खलनायिकेला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा हे दोन्ही पुरस्कार मिळणं ही कीमया फक्त लेखिका मधुगंधा कुलकर्णी हीच करू शकते!!! थॅंक यू मधुगंधा!! मी खरोखर तुझी ऋणी आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला आनंद तर झालाच पण ह्या फोटोतून तुमच्या लक्षात आल असेल माझ्या बाजुला ऊभी असलेली शर्मिष्ठ राऊत, आमची निर्माती तिलाही माझ्याइतका किंवा खरतर माझ्यापेक्षाही जास्त आनंद झालाय!! आणि तेवढाच आनंद “तुला शिकवीन चांगलाच धडा” टिममधल्या प्रत्येक मेंबरला झालाय हे मला माहित आहे. थँक यू टीम!! थॅंक यू चंदु सर, आमचे दिग्दर्शक. I am a Director’s Actor; मी भुवनेश्वरी तुमच्या सहकार्याशिवाय साकारू शकले नसते आणि थँक यू टीम झी ही संधी दिल्याबद्दल ! ! पाहात रहा “तुला शिकवीन चांगलाच धडा.”
हेही वाचा : कविता मेढेकरांनी उलगडलं त्यांच्या फिटनेसचं गुपित, ‘अशी’ घेतात स्वतःच्या आरोग्याची काळजी
आता त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्यांचे चाहते आणि या मालिकेचे प्रेक्षक त्यांचं अभिनंदन करत आहेत.