सोनी टीव्हीवरील लोकप्रिय क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती’चा आगामी एपिसोड खूपच खास असणार आहे. ११ ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन यांचा ८० वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा वाढदिवस केबीसीच्या सेटवर खास पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. नुकताच सोनी टीव्हीने एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ज्यात बिग बी अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसह हॉट सीटवर बसलेले दिसत आहे. तर पत्नी जया बच्चन त्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. केबीसीचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. जो खूपच मजेदार आहे. या प्रोमोमध्ये जया बच्चन पती अमिताभ बच्चन यांची कधी फिरकी घेताना तर कधी त्यांच्याबद्दल तक्रार करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन मात्र बायकोच्या तक्रारी ऐकून अवाक झालेले पाहायला मिळत आहेत. अमिताभ आणि जया बच्चन यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

aishwarya rai bachchan tried avoiding eye contact with ex boyfriend vivek oberoi
बच्चन घराण्याची सून झाल्यावर एक्स बॉयफ्रेंड विवेक ओबेरॉयला पाहून ऐश्वर्या राय झालेली अस्वस्थ, नेमकं काय घडलेलं? वाचा…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jaya Bachchan News
Jaya Bachchan : जया बच्चन यांचं वक्तव्य, “महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले आणि…”
Kushal Badrike Post For Shreya Bugde
“तुला भेटल्यावर…”, श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त कुशल बद्रिकेची खास पोस्ट; म्हणाला, “स्वर्गसुद्धा नरक वाटेल…”
Rohit Sharma Viral Video of BCCI Awards on Smriti mandhana Question
VIDEO: “माझी बायको बघत असेल…”, विसरभोळ्या रोहित शर्माचं स्मृती मानधनाच्या प्रश्नावर भलतंच उत्तर; नेमकं काय घडलं?
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Samay Raina Asks Amitabh Bachchan For Property Mein Hissa
अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ डायलॉग अन् समय रैनाने मागितला संपत्तीत हिस्सा, केबीसीतील व्हिडीओ तुफान व्हायरल
amit bhanushali birthday on set villain priya new look grabs attention
Video : ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अर्जुनच्या वाढदिवसाची धमाल! खलनायिका प्रियाच्या नव्या लूकने वेधलं लक्ष, मिळाली मोठी हिंट

आणखी वाचां- अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम होतं का? प्रश्नावर रेखा म्हणाल्या होत्या, “मला आजपर्यंत असा पुरुष…”

या प्रोमोमध्ये जया बच्चन बिग बींना सांगतात, “मी पाहिलं तर नाही पण मी अनेकदा ऐकलं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचं काम पाहून प्रभावित होता, तेव्हा त्यांना फुलं पाठवता किंवा चिठ्ठी लिहिता. पण मला आजपर्यंत अशी चिठ्ठी लिहिलेली नाही किंवा फुलंही पाठवलेली नाही. तुम्ही पाठवली आहेत का कधी?” जया यांच्या या तक्रारीनंतर बिग बी अवाक होतात आणि म्हणतात, “अरे हे सर्व सार्वजनिक होतंय… ही तर चुकीची गोष्ट आहे यार.” यावर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन म्हणतो, “अजिबात नाही… पुढे- पुढे काय होईल तुम्हाला कळणारच आहे.”

आणखी वाचा- Video : “त्यांचा आदर करा” वडिलांबाबत ऐकताच अभिषेक बच्चनला राग अनावर, शो सोडून निघून गेला अन्…

दरम्यान केबीसीचा आगामी एपिसोड बिग बी अमिताभ बच्चन वाढदिवस स्पेशल असणार आहे. यानिमित्ताने केबीसीच्या मंचावर बच्चन कुटुंबाने हजेरी लावली असून याचे आणखी काही प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ज्यात अमिताभ बच्चन काहीसे भावूक झालेले दिसले होते. याशिवाय या एपिसोडमध्ये जया बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन धम्माल करताना दिसणार आहेत.

Story img Loader