सध्या सोनी टिव्ही वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे चौदावे पर्व सुरु आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करत आहेत. या कार्यक्रमाच्या मंचावर त्यांनी अभिषेक, जया, काही स्पर्धक आणि उपस्थित प्रेक्षकांसह ८० वा वाढदिवस साजरा केला होता. मागील अनेक वर्षांपासून ते या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. ते ‘केबीसी’ची ओळख बनले आहेत. अभिताभ बच्चन यांचा प्रभाव त्यांच्यासमोर बसलेल्या स्पर्धकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट पाहायला मिळतो. आपल्यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ते खेळ सुरु असताना त्यांच्याशी संवाद साधतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या भागामध्ये रुची नावाच्या स्पर्धक हॉटसीटवर बसल्या होत्या. गुरुग्राममध्ये राहणाऱ्या रुची मीडिया अ‍ॅनलिस्ट म्हणून काम करत आहेत. त्यांनी अमिताभ यांच्याशी बोलताना मीडिया अ‍ॅनलिस्टच्या कामाची थोडक्यात माहिती दिली. ‘केबीसी’च्या खेळादरम्यान त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. तेव्हा रुची यांनी बच्चनसाहेबांना “करवा चौथच्या सणाच्या दिवशी मी आणि माझ्या पतीने मिळून एकमेकांसाठी उपवास केला होता”, असे सांगितले.

आणखी वाचा – आमच्या आगामी चित्रपटाचे नाव ओळखा पाहू; अभिनेत्री पल्लवी जोशीची ‘ही’ पोस्ट चर्चेत

त्यावर प्रतिक्रिया देताना अमिताभ यांनी “लग्नानंतर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये मीही जया यांच्यासाठी करवा चौथचा उपवास करायचो. मग पुढे हळूहळू ती सवय मोडली”, असे म्हटले. या भागामध्ये त्यांनी खासगी आयुष्यातील अन्य काही आठवणी सांगितल्या. काही दिवसांपूर्वी अमिताभ-जया यांच्या नातीच्या, नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये जया यांनी हजेरी लावली होती. तेव्हा जया यांनीही लग्नाबद्दलच्या त्यांच्या खास आठवणी सांगितल्या होत्या.

आणखी वाचा – “…मेलास तरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरशील”; भालजी पेंढारकरांच्या या वाक्यानंतर वन टेक ‘ओके’

तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, “मला दररोज ९ ते ५ कामासाठी बाहेर जाणारी पत्नी नकोे आहे. तू काम कर, पण रोज त्यासाठी घराबाहेर जाऊ नकोस. काम करताना योग्य लोक आणि चांगले प्रोजेक्ट्स निवड, असे मला अमिताभ यांनी सांगितले होते. त्यावर्षी मी खूप काम करत होते. ऑक्टोबर महिन्यामध्ये काम कमी असल्यामुळे त्याच महिन्यामध्ये लग्न करायची अट त्यांनी मला घातली होती.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kbc 14 amitabh bachchan shares a special memory after marriage yps