सध्या नव्या मालिकांचं हंगाम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नवनवीन मालिकांची घोषणा होत आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘पारु’ व ‘शिवा’ या दोन नव्या मालिका नुकत्याच सुरू झाल्या. त्यानंतर आता ‘जगद्धात्री’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिका देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दुसऱ्या बाजूला ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. ‘घरोघरी मातीचा चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन नव्या मालिका ‘स्टार प्रवाह’वर सुरू होणार आहेत. अशातच या नव्या मालिकांच्या शर्यतीत ‘कलर्स मराठी’ वाहिनीची देखील एन्ट्री झाली आहे. कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी नव्या मालिकेची घोषणा केली आहे.

दिग्दर्शक व कलर्स मराठीचे प्रोगामिंग हेड केदार शिंदे यांनी काल, १४ फेब्रुवारी सोशल मीडियाद्वारे नव्या मालिकेची घोषणा केली. ‘इंद्रायणी’ असं ‘कलर्स मराठी’च्या नव्या मालिकेचं नाव आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत केदार शिंदे यांनी लिहिलं आहे, “वयाच्या ५२व्या वर्षी…मी एक नवी जबाबदारी स्वीकारली.. कलर्स मराठी प्रोगामिंग हेड…हे सगळं तुमच्या प्रेमाने आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य झालं. पुन्हा नव्या कलाकृतीचं टेन्शन आहेच…ही नवी कलाकृती माझ्या कलर्स मराठी टीमच्या मदतीने सादर होतेय. त्याचा हा पहिला टिझर…नक्की कळवा.. कसा वाटतोय ते.”

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ

हेही वाचा – ९०च्या दशकातील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात वर्णी, साकारणार भूताची भूमिका!

हेही वाचा – अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीचं इन्स्टाग्राम अकाउंट झालं होतं हॅक, म्हणाली, “माझ्यासाठी हा अनुभव…”

‘इंद्रायणी’ या मालिकेच्या पहिल्या-वहिल्या प्रोमोवर कलाकार मंडळीसह नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्चना निपाणकर, जयवंत वाडकर, सावनी रविंद्र, अक्षय केळकर, अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, सुकन्या मोने अशा अनेक कलाकार मंडळींनी या नव्या मालिकेच्या प्रोमोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “उत्तम सर आणि तुम्ही आजपर्यंत आम्हाला उत्तम सिनेमे दिले आहेत. यापुढे सुद्धा उत्तम असणार यात काही शंका नाही…श्री स्वामी समर्थ”, “सुंदर प्रोमो! अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा”, “केदार दादा, तुझी कथा मनात नेहमीच घर करून जाते. मनाला भावणार, आपल्या मातीतलं, आपलंस मांडणारा तूच अवलिया आहेस. आमचा केदार दादा,” अशा अनेक प्रतिक्रिया ‘इंद्रायणी’ मालिकेच्या पहिल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

Story img Loader