मोदी आडनावारून केलेल्या वक्तव्यानंतर गुरुवारी सुरत न्यायालयाने राहुल गांधी मानहानी प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शुक्रवारी राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. यावरून आता देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. तसेच यावर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटलल्या.

‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेची गर्लफ्रेंड आहे ‘ही’ सोशल मीडिया स्टार? अभिनेता उत्तर देत म्हणाला…

मराठी टीव्ही कलाकार केतकी चितळेनेही राहुल गांधीची सदस्यता रद्द झाल्यानंतर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने राहुल गांधींवर मानहानी प्रकरणातील कारवाई व तिच्यावर शरद पवार यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर झालेली कारवाई, या दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडला आहे. तिने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

“मी त्याला म्हटलं होतं की…”, सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर; म्हणाल्या “त्याच्या मृत्यूच्या दिवशी मी…”

“काही लोकांच्या मते ते राहुल गांधींना घाबरले असल्याने मानहानीचा खटला दाखल केला. या लॉजिकने लोक मलाही घाबरले होते का?” असं तिने म्हटलं आहे. यावर तिने विचार करतानाचे हावभाव दर्शवणारे व हसणारे इमोजी टाकले आहेत.

ketaki chitale post
केतकी चितळेची पोस्ट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मे महिन्यामध्ये केतली चितळेला अटक करण्यात आली होती. तिच्यावर सार्वजनिक दुष्प्रचार, बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व वाढवणे या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस कोठडीत ठेवल्यानंतर तिची सुटका झाली होती. याच प्रकरणाचा संदर्भ तिने आता राहुल गांधी यांच्यावरील कारवाईशी जोडत ही पोस्ट केली आहे.