नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालय सध्या तेथील मृतांच्या संख्येमुळे चर्चेत आहे. तिथे २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मृतांमध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश असल्याने प्रकरण खूप गाजलं. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील या प्रकारानंतर खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता शाम वाकोडे यांना शौचालय साफ करण्यास लावल्याची घटना घडली. याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड रुग्णालयातील बळी प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा : सुषमा अंधारे

“आता एका हॉस्पिटल डीनला हॉस्पिटलमधील संडास साफ करा हे त्याची जात बघून सांगायचे तर!
आणि तरीही राव आपल्याकडे खोट्या अॅट्रोसिटी केसेस टाकल्या जात नाहीत.
जय हो अॅट्रोसिटी अॅक्ट १९८९. आम्ही सामान्य माणसांवर काय तर आता कुठल्याही पदाला सोडणार नाही,”
अशी पोस्ट केतकी चितळेने केली आहे. याबरोबर तिने युनिफॉर्म क्रिमिनल लॉ आणि वन नेशन वन लॉ असे हॅशटॅग दिले होते.

केतकी चितळेची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील अधिष्ठाता म्हणजेच डीन यांना शौचालय साफ करायला लावल्यानंतर वादाला तोंड फुटलं. त्यानंतर या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ketaki chitale post on nanded govt hospital death case mp hemant patil asked dean to clean toilet hrc