‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वाच्या विजेतेपदावर डिनो जेम्स याने आपलं नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा या स्पर्धकांचा पराभव करून त्याने ‘खतरों के खिलाडी’ची ट्रॉफी जिंकली. शनिवारी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. अंतिम फेरीत सर्व सहभागी स्पर्धकांनी हजेरी लावली होती. या वेळी विजेता डिनो जेम्सने त्याच्या संपूर्ण ‘खतरों के खिलाडी’च्या प्रवासावर एक रॅप गाणं सादर केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Sindhutai Maazi Maai: छोट्या चिंधीने आतापर्यंतच्या प्रवासाचा व्हिडीओ केला शेअर; म्हणाली, “सिंधुताई यांच्यासारख्या…”

डिनो जेम्सने ‘खतरों के खिलाडी १३’च्या ट्रॉफीसह रोख २० लाख रुपये आणि एक कारदेखील जिंकली. अंतिम फेरीत दाखल झालेल्या अरिजित तनेजा आणि ऐश्वर्या शर्मा यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण, डिनो जेम्सबद्दल फारशी कोणालाच माहिची नाही. तो नेमका कोण आहे जाणून घेऊया…

हेही वाचा : “नाचणीची भाकरी, मच्छी फ्राय अन्…” प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने चुलीवर बनवलं जेवण, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

डिनो जेम्स हा एक प्रसिद्ध रॅपर असून, त्याने ‘बॉयफ्रेंड’, ‘धीरे-धीरे’, ‘होये इश्क ना’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत. तो सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आपल्या विजयाबद्दल सांगताना डिनो म्हणाला, “‘खतरों के खिलाडी १३’ चा एक भाग होणं, ही मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती. या शोमध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी निर्मात्यांचा आभारी आहे.”

“रोहित शेट्टी सरांकडून मला अनेक गोष्टी शिकता आल्या. रोहित सरांनी केलेलं कौतुक आणि मनातील भीती दूर करून केलेले स्टंट…मी एवढा पुढे येईन असा विचार कधीच केला नव्हता. या कार्यक्रमामुळे मला अनेक मित्र मिळाले आणि ती मैत्री बाहेरही कायम राहील.” असं डिनो म्हणाला.

हेही वाचा : ‘अंकुश’ चित्रपटामुळे सोशल मीडियावर ट्रोल होणारा दिपराज घुले आहे तरी कोण?

दरम्यान, यापूर्वी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना डिनो जेम्सने पहिल्यांदा ‘खतरों के खिलाडी १३’ची ऑफर आल्यावर स्वीकारली नसल्याचं मान्य केलं. तो म्हणाला, “माझ्या टीमने मला ‘खतरों के खिलाडी १३’बद्दल सांगितल्यावर मी नकार दिला होता. परंतु, बऱ्याच लोकांनी मला समजावून सांगितलं. शेवटी खूप दिवसांनी मी तयार झालो.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khatron ke khiladi 13 dino james win kkk 13 trophy and 20 lakh cash beats arjit taneja and aishwarya sharma sva 00
Show comments