‘खतरों के खिलाडी’ हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणून ओळखला जातो. लवकरच या कार्यक्रमाचा १३ वे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाच्या शूटींगला नुकतंच सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत या कार्यक्रमाच्या शूटींगलाही सुरुवात झाली आहे. नुकतंच याचा एक व्हिडीओ अभिनेता शिव ठाकरेने शेअर केला आहे.

शिव ठाकरे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. शिव ठाकरे हा सध्या दक्षिण आफ्रिकेत ‘खतरो के खिलाडी’साठी गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे हा ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमादरम्यानचे काही व्हिडीओ पोस्ट करताना दिसत आहे. नुकतंच त्याने या कार्यक्रमाचे होस्ट रोहित शेट्टी यांच्याबरोबर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओत ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमाचे स्पर्धक एका ठिकाणी उभे असल्याचे दिसत आहेत. त्यावेळी रोहित शेट्टी हा चालत येताना दिसत आहे. रोहित शेट्टीला पाहताच शिव हा त्याच्याबरोबर हात मिळवतो. त्यानंतर हे सर्व स्पर्धक विविध पोझ देत फोटो काढताना दिसत आहेत. “जेव्हा रोहित शेट्टी असं करतात, तेव्हा ट्रेंड अजूनच ट्रेंड व्हायला लागतो”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

दरम्यान यंदा ‘खतरो के खिलाडी’ या कार्यक्रमात शिव ठाकरे, डेझी शाह, ऐश्वर्या शर्मा, शीझान खान, रोहित रॉय, अंजली आनंद, अर्चना गौतम, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, नायरा बॅनर्जी हे कलाकार दिसणार आहेत. त्याबरोबरच या कार्यक्रमात अब्दु रोजिक देखील पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे.