बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा लोकप्रिय ‘खतरों के खिलाडी १४’ कार्यक्रम ऑनएअर होण्यापूर्वीची खूप चर्चेत आला आहे. स्टंटवर आधारित असलेला ‘खतरों के खिलाडी’च्या १४व्या पर्वाचं चित्रीकरण सध्या रोमानियामध्ये सुरू आहे. या चित्रीकरणादरम्यानचे सतत नवनवीन अपडेट समोर येत आहेत. स्पर्धकांमधली भांडणं, कोण स्पर्धेतून बाहेर झालं, कोणाला काढलं अशाप्रकारचे अनेक वृत्त आतापर्यंत आले आहेत. अशातच स्पर्धक शालिन भनोट स्टंट दरम्यान जखमी झाल्याचं समोर आलं आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ त्यानं स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.

“जे सगळं करतोय ते तुमच्यासाठी”, असं कॅप्शन लिहित शालिन भनोटनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शालिन जखमी झालेला दिसत असून त्याचं तोंड सुजलेलं पाहायला मिळत आहे. यावेळी ‘खतरों के खिलाडी’ मधील डॉक्टर्स त्याची काळजी घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवर शालिनने शाहरुख खानच्या ‘कल हो ना हो’ गाण्याचं म्युझिक लावल्यामुळे तो काय म्हणतोय? हे कळतं नाहीये. पण याचा ओरिजनल व्हिडीओ देखील समोर आला आहे.

हेही वाचा – Video: “खल्लास”, अल्लू अर्जुन व रश्मिकाच्या ‘अंगारों’ गाण्यावर गौतमी पाटीलचा जबरदस्त डान्स पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस

या ओरिजनल व्हिडीओमध्ये शालिनी विंचवांनी दंश केल्याचं सांगताना दिसत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. माहितीनुसार, एक-दोन नव्हे तर तब्बल २००हून अधिक विंचवांनी शालिनला दंश केला आहे. त्यामुळे त्याची अभिनेत्याची अशी अवस्था झाल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’चा ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रम ‘या’ तारखेपासून होणार सुरू

शालिनच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहते त्याला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. तर कोणी त्याला ‘फायटर’ म्हणत आहेत. अलीकडेच रोहित शेट्टीनं एका स्टंट दरम्यान शालिन भनोटचं कौतुक केल्याचं समोर आलं होतं. रोहित म्हणाला होता, “शालिनमध्ये त्याला ‘खतरों के खिलाडी १४’चा विजेता दिसत आहे. तो स्टंट खूप उत्कृष्टरित्या पार करत आहे.”

हेही वाचा – शरद पवार आणि ‘झपाटलेला’ चित्रपटाचं आहे खास कनेक्शन, महेश कोठारेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी’च्या यंदाच्या पर्वात असिम रियाज, कृष्णा श्रॉफ, सुमोना चक्रवर्ती, शालिन भनोट, अभिषेक कुमार, नियाती फटनानी, करण वीर मेहरा, आशीष मल्होत्रा, शिल्पा शिंदे आणि गश्मीर महाजनी या सर्वांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे.