Khatron Ke Khiladi 14 Winner: स्टंट आधारित रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी १४’ ची मागील काही महिने खूप चर्चा होती. रोहित शेट्टीने दिलेले कठीण टास्क, स्पर्धकांना स्टंट करताना आलेल्या अडचणी, एकमेकांशी भांडणं यानंतर अखेर रविवारी (२९ सप्टेंबर रोजी) शोचा ग्रँड फिनाले पार पडला. सर्व स्पर्धकांना मागे टाकत करणवीर मेहरा १४ व्या पर्वाचा विजेता ठरला.

फिनाले एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना त्यांच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यांनी सर्व स्पर्धकांबरोबर खूप धमाल केली. करणवीर मेहरा हा टॉप ३ मध्ये स्थान मिळवणारा पहिला स्पर्धक होता. यानंतर कृष्णा श्रॉफने फिनाले गाठला आणि त्यानंतर गश्मीर फिनालेमध्ये पोहोचला. त्यानंतर या तिघांमध्ये फिनाले स्टंट खेळला गेला. करणवीरने गश्मीर आणि कृष्णा यांना हरवून शोची ट्रॉफी जिंकली. करणवीरचे ट्रॉफीबरोबरचे फोटो व्हायरल होत आहेत.

‘खतरों के खिलाडी १४’ चा विजेता करणवीर मेहरा

हेही वाचा – Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

ट्रॉफीसह मिळाली कार

करणवीर मेहराला ‘खतरों के खिलाडी १४’ च्या ट्रॉफीसह एक कारही मिळाली. तसेच त्याला २० लाख रुपये रोख रक्कम मिळाली.

दरम्यान, करण वीर मेहरा व्यतिरिक्त कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, गश्मीर महाजनी आणि अभिषेक कुमार हे टॉप ५ सदस्य होते. शेवटी सर्वांना मागे टाकत करणवीरने ट्रॉफी आणि इतर बक्षीसं जिंकली. करण वीर मेहरा आता सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसणार अशी चर्चा आहे, पण तो स्वतः मात्र याबाबत बोलणं टाळत आहे.