Khushboo Tawde and Sangram Salvi : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे व संग्राम साळवीची जोडी. आता ही प्रेक्षकांची लाडकी जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. ही आनंदाची बातमी नुकतीच खुशबूने सोशल मीडियावरून जाहीर केली आहे. त्यामुळे खुशबू व संग्रामवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
अभिनेत्री खुशबू तावडेने ( Khushboo Tawde ) ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’मधून एक्झिट घेतली आहे. यावेळीच खुशबू दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं होतं. २०१८मध्ये खुशबू व संग्रामचं लग्न झालं. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदाच आई-बाबा झाले. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव आहे. खुशबू व संग्रामचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे. अशातच आता आणखी एका पाहुण्याचं आगमन होणार आहे. खुशबू व संग्रामच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हेही वाचा – विजय कदम आणि पल्लवी जोशी यांच्यातील खास नातं तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या…
“थोडंसं आणखीन प्रेम आमच्या कुटुंबात सामिल होतं आहे”, असं कॅप्शन देत खुशबूने ( Khushboo Tawde ) व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, खुशबू, संग्राम व राघव यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. यावेळी संग्राम सोनाग्राफी दाखवत आहे. ऑक्टोबर महिन्यात खुशबू दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे, असं कॅप्शनमधून सांगितलं आहे. तिघांचा या व्हिडीओवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.
खुशबू, संग्राम आणि राघवचा सुंदर व्हिडीओ पाहा
तितीक्षा तावडे, अपूर्वा गोरे, अभिज्ञा भावे, रश्मी अनपट, रुचिका कदम, ऋतुजा बागवे, प्रसाद जवादे, शिवानी रांगोळे, धनश्री काडगांवकर, अश्विनी कासार, पल्लवी कदम, गौरव घाटणेकर, अनघा अतुल अशा अनेक कलाकारांनी खुशबू व संग्रामला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा – विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”
दरम्यान, गरोदर असल्यामुळे खुशबूने ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून निरोप घेतला आहे. आता खुशबू तावडेची ( Khushboo Tawde ) जागा मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी वैद्यने घेतली आहे. पल्लवी उमाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील पल्लवीच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd