Saara Kahi Tichyasathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील उमा असो, रघुनाथ खोत असो किंवा निशी, ओवी, श्रीनू असो या सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. यामुळेच ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. असं असताना मालिकेतून उमा पात्र साकारणारी अभिनेत्री खुशबू तावडेने ( Khushboo Tawde ) अचानक एक्झिट घेतली आहे. यामागचं कारण वैयक्तिक असून उमाच्या भूमिकेत आता लोकप्रिय अभिनेत्री पाहायला मिळणार आहे.
‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडेने ( Khushboo Tawde ) साकारलेली उमा घराघरात पोहोचली होती. साधीसरळ असणारी उमा खुशबूने उत्तमरित्या साकारली होती. पण आता खुशबू दुसऱ्यांदा गर्भवती असल्यामुळे तिने मालिकेचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. हो, हे खरं आहे. खुशबू पुन्हा एकदा आई होणार आहे. याआधी २ नोव्हेंबर २०२१मध्ये खुशबूला मुलगा झाला होता. ज्याचं नाव राघव असून तो ३ वर्षांचा आहे. आता खुशबूच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. त्यामुळे खुशबूची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतून अचानक एक्झिट झाली आहे. यानिमित्ताने मालिकेच्या टीमने खुशबूचा शेवटचा दिवस सेलिब्रेट केला. केक कापून आणि गिफ्ट्स देऊन मालिकेतील कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – Bigg Boss Marathi : “मी तर अनाथ मुलगीच बायको करणार”, घरच्यांच्या आठवणीत सुरज चव्हाणने केलं वक्तव्य
उमाची भूमिका कोण साकारणार?
खुशबू तावडेची ( Khushboo Tawde ) जागा मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पल्लवी वैद्यने घेतली आहे. पल्लवी आता उमाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील पल्लवीच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे.
दरम्यान, पल्लवी वैद्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, याआधी पल्लवी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये पाहायला मिळाली होती. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत पल्लवी वैद्यने क्षमाची भूमिका साकारली होती. तसंच पल्लवीने ‘अजुनही बरसात आहे’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. याशिवाय ती बऱ्याच चित्रपटांमध्येही झळकली होती.
© IE Online Media Services (P) Ltd