तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली. ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेच्या सेटवर या दोघांची पहिली भेट झाली होती. तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला कलाविश्वातील बरीच मंडळी उपस्थित राहिली होती. आज त्यांच्या लग्नाला २ महिने पूर्ण झालेले आहेत. यानिमित्त तितीक्षाची बहीण खुशबू तावडेने लाडक्या बहिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खुशबू आणि तितीक्षा तावडे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीच्या लग्नातील एक खास व्हिडीओ खुशबूने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघीही आनंदात दिसत असून खुशबू तिला मुंडावळ्या बांधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…

खुशबू लिहिते, “माझ्या आवडत्या सोहळ्यातील काही खास आठवणी. माझी प्रिय गुड्डा मी तुझ्या कायम पाठिशी आहे आणि आयुष्यभर मी तुझ्याबरोबर आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षा तुम्हाला दोघांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!”

हेही वाचा : Video : ‘कन्यादान’ फेम अमृता बनेचं सासरी ‘असं’ झालं स्वागत! सूनबाई अन् लेकासाठी सासऱ्यांनी केली खास तयारी

तितीक्षाचा नवरा सिद्धार्थ बोडके, अनघा अतुल, ऐश्वर्या नारकर, स्मिता शेवाळे, गौरी नलावडे या कलाकारांनी कमेंट्स करत तावडे सिस्टर्समध्ये असणाऱ्या सुंदर अशा बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. अभिनेत्रीने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khushboo tawde shares unseen video of titeeksha tawde marriage ceremony sva 00