इंडिया! इंडिया! हा गजर ऐकला की मॅच चालू आहे, असं समजून जायचं. भारतात क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर काहींचा श्वास अन् काहींचा धर्म आहे. येणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आणि विश्वचषक जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि संघ तयार आहे. भारताने या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्वच सामने जिंकले आहेत. या निमित्ताने झी मराठीच्या काही कलाकारांनी त्यांचं क्रिकेट प्रेम व्यक्त करत जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सारं काही तिच्यासाठीची’ उमा म्हणजेच खुशबू तावडे म्हणाली, “मी शाळेत महिला क्रिकेट संघाचा भाग होते आणि राज्य स्तरावर क्रिकेट खेळले आहे. मला आज ही लक्षात आहे आमच्या म्हात्रे गुरुजींनी घोषणा केली होती की महिलांचा क्रिकेट संघ आपण बनवतोय ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपली नाव नोंदवावी. पहिल्यांदा सीजन बॉल हातात घेतला आणि मी क्रिकेटच्या प्रेमात पडले. बॅटिंगपेक्षा बॉलिंग करण्यामध्ये मला जास्त मजा यायची कारण बॅट आणि माझी उंची सारखीच होती तेव्हा तर बॅट पकडायची म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत होती. पण मग दहावीतला अभ्यास आणि तितकस मार्गदर्शन न मिळाल्यामुळे माझं क्रिकेट खेळणं सुटलं. क्रिकेट लहानपणापासून माझ्यासाठी खूप जवळचा विषय राहिला आहे. भारतीय टीमला विश्वचषक मध्ये खेळताना बघायची नेहमीच उत्सुकता असते. १९ नोव्हेंबरला जरी शूट करत असली तरी सेटवर आमचं नियोजन चालू आहे. माझ्या मोबाईलमध्ये मॅचचे अपडेट नोटिफिकेशन चालूच राहणार. माझा आवडता खेळाडू हार्दिक पंड्या आहे ज्याला मी या सामन्यामध्ये मिस करणार आहे. भारतीय टीमला इतकंच सांगेन बोलीन ‘तुम्ही बेफिकिर होऊन खेळा आम्ही तुमच्या सोबत आहोत.”

दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नेत्रा म्हणजे तितिक्षा तावडे म्हणाली, “मी खूप जास्त उत्साही आहे. पण १९ नोव्हेंबरला आमचं शूट असणार आहे. आमच्या सेटवर सर्व क्रिकेट प्रेमी आहेत तर मोबाईलवर का होईना पण मॅच जरूर बघणार. आम्ही सर्व एकत्र सेटवर प्रत्येक विकेट आणि सेंचुरी साजरी करणार. क्रिकेट आणि माझं नातं अतूट आहे मला कुठेही एक फळी जरी मिळाली तरीही मी क्रिकेट खेळायला सुरु करते. मी साधारण ८ वर्षाची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि १२वी ला जाईपर्यंत मी क्रिकेट खेळात होते. मी राष्ट्रीय स्तरावर ही क्रिकेट खेळली आहे. या वेळी सेटवर विश्वचषक पाहण्याचा आनंदच वेगळा असणार आहे.”

‘सारं काही तिच्यासाठी’ ची दक्षता जोईल म्हणजेच निशिगंधा म्हणाली, “अभिमान आहे मला आपल्या भारतीय संघाचा ज्या प्रकारे त्यांनी विश्वचषकची प्रत्येक मॅच गाजवली आहे. १९ नोव्हेंबरच्या अंतिम मॅचची जिज्ञासा अजून वाढली आहे. माझं क्रिकेटच नातं तेवढं दाट नसलं तरीही लहानपणी मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळण्याची आठवण माझ्या मनात अजूनही आहे. सर्वात जास्त मला जे आवडत तो म्हणजे भारतीयांमधला तो जोश. त्या दिवशी रस्ते शांत असणार हे नक्की आहे आणि घराघरात थरारक ऊर्जा दिसून येणार आहे. भारतीय टीमला एकच सांगणं आहे की संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही निश्चिंत होऊन खेळा.”

“भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक जिंकल्यास मी बीचवर न्यूड धावेन,” अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

रुची कदम म्हणजेच ‘सारं काही तिच्यासाठी’ मधली ओवी म्हणते, “क्रिकेटची माझी आवडती आठवण म्हणजे बाबांसोबत क्रिकेटचे महारथी सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेला खेळताना पाहिलेला क्षण. मी खूप लहान होती मला तितकस आठवत नाही पण मला लक्षात आहे बाबा ज्या विद्यालयात शिक्षक होते तिथे हे दोघे खेळायला आले होते. आम्ही सर्व त्यांना खेळताना बघायला गेलो होतो. मला क्रिकेटची जितकी माहिती आहे ती माझ्या बाबांमुळे. १९ नोव्हेंबरला आम्ही आमच्या मालिकेचा महासंगम विशेष भाग शूट करत असू, तरी शूटिंग आणि मॅचचा स्कोर या दोन गोष्टींवर आमचं लक्ष असणार आहे.”

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतला अभिषेक गावकर म्हणजेच तुमचा लाडका श्रीनु म्हणाला, ‘मी चाळीत लहानपणापासून राहल्यामुळे गल्ली क्रिकेट रोज खेळायचो आणि माझ्या घरी क्रिकेटच छोटं किट असायचं. मी ऑल राऊंडर होतो आणि आता ही जेव्हा सेलिब्रिटी क्रिकेट मॅच होतात तेव्हा मी वेळ काढून खेळायला जातो. मला इतकं क्रिकेटच वेड आहे की, मी वरळीला राहत असल्यामुळे वानखडे स्टेडियममध्ये खूप वेळा भारताची मॅच पाहायला जायचो. आज मी जर कलाकार नसतो आज तर नक्कीच क्रिकेटर असतो. भारतीय संघाने विश्व चषकाच्या प्रत्येक टप्यावर आतापर्यंत जे यश मिळवलं आहे. मला विश्वास आहे वर्ल्ड कप ही भारतच घरी आणणार.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khushbu tawade ruchi kadam sara kahi tichyasathi fame actors best wishes fo team india world cup 2023 hrc