‘आई कुठे काय करते’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेची कथा, संवाद, सर्व कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. तर आता या मालिकेत एक नवं वळण येणार आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच या मालिकेमध्ये अरुंधती आणि आशुतोषचा विवाह सोहळा संपन्न झाला. तर आता देशमुख कुटुंबात ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरू आहे. आता अशातच या मालिकेमध्ये आशुतोषची बहीण वीणाची एन्ट्री होणार आहे. वीणा ही आशुतोषची आत्येबहीण आहे. ही भूमिका अभिनेत्री खुशबू तावडे साकारताना दिसणार आहे.

Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
laxmichya paulanni apurva sapkal exit from show
ध्रुव दातार पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! तिच्याऐवजी मालिकेत कोण झळकणार?
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
Kshitee Jog
क्षिती जोगने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका का सोडलेली? अभिनेत्री म्हणाली, “खूप चुकतंय…”

आणखी वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम गौरी कुलकर्णीचा अपघात, भरधाव वेगात येणाऱ्या बाईकस्वाराची अभिनेत्रीच्या स्कुटीला जोरदार धडक

खुशबूने नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या मालिकेच्या सेटवरील तिचे काही फोटो पोस्ट करून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. गरोदरपणामुळे काही महिन्यांपूर्वी तिने कामातून ब्रेक घेतला होता. तर आता या मालिकेच्या माध्यमातून ती मोठ्या ब्रेकनंतर टेलिव्हिजनवर पुनरागमन करणार आहे. या मालिकेच्या सेटवरील फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “नवीन… वीणा. ‘आई कुठे काय करते!’ १३ मेपासून.”

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेला भेटला आयुष्याचा जोडीदार, नात्यावर शिक्कामोर्तब करीत म्हणाली…

आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. ती आता या मालिकेत दिसणार असल्याने तिचे चाहते तिला पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. त्यांची उत्सुकता त्या पोस्टवर कमेंट करत दाखवत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “मी हा फोटो आणि ही बॅकग्राऊंड पाहूनच ओळखलं की, तुम्हीच वीणा असाल. या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “अखेर तू स्टार प्रवाहवर पुनरागमन केलंस… मला याच चॅनेलवर तुला आणखीन नव्या भूमिकेत पाहायला आवडेल. तुला खूप साऱ्या शुभेच्छा.” तिच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलं आहे.

Story img Loader