Devmanus Fame Kiran Gaikwad Haldi Ceremony : ‘माझी होम मिनिस्टर’ म्हणत काही दिवसांपूर्वीच अभिनेता किरण गायकवाडने प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियावर दिली होती. आपल्या होणाऱ्या पत्नीबरोबर रोमँटिक फोटो शेअर करत किरणने लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर संपूर्ण मालिकाविश्वातून किरणवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. छोट्या पडद्यावर अभिनेत्याचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तसेच त्याची होणारी बायको वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्रीच आहे. त्यामुळे या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या लग्नसोहळ्याला अनेक कलाकार मंडळी पोहोचले आहेत.

किरण आणि वैष्णवी यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकताच या दोघांचा साखरपुडा पार पडला. यावेळी अभिनेत्याने गुडघ्यावर बसून अभिनेत्रीला अंगठी घातल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. थाटामाटात साखरपुडा पार पडल्यावर आता दोघांच्या हळदी समारंभाला सुरुवात झाली आहे. हळदीसाठी मांडवात एन्ट्री घेताना किरण आणि वैष्णवीने भन्नाट डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video Of Little Girl
‘साजन जी घर आये’ गाणं वाजताच टेरेसवर ‘तिनं’ धरला ठेका; चिमुकलीचा व्हायरल VIRAL VIDEO एकदा बघाच
Lagnanantar Hoilach Prem New Promo
लग्नानंतर होईलच प्रेम : ‘या’ तामिळ मालिकेचा रिमेक, मृणालचं कमबॅक अन्…; पाहा जबरदस्त नवीन प्रोमो
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video
keerthy suresh antony thattil wedding
नागा चैतन्य-सोभितानंतर आणखी एक अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंडबरोबर पोहोचली गोव्यात; पत्रिका पाहिलीत का?
uncle dance video goes viral
‘तांबडी चामडी चमकते उन्हात लका लका’ गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा : “हा अपघात राजकीय प्रचारसभेत झाला असता…”, अल्लू अर्जुनच्या अटकेवर विवेक ओबेरॉयचं स्पष्ट मत; उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

‘लागिरं झालं जी’ या मालिकेत झळकलेले बहुतांश कलाकार किरणच्या लग्नासाठी कोकणात पोहोचले आहे. निखिल चव्हाण, सागर चव्हाण, महेश जाधव, राहुल मगदूम, पूर्वा शिंदे, ओंकार ढगे, अभिनव कुराणे या कलाकारांनी किरण-वैष्णवीचा साखरपुडा आणि हळदी समारंभातील सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Devmanus Fame Kiran Gaikwad Wedding :
किरण गायकवाड लग्नसोहळा ( Devmanus Fame Kiran Gaikwad Wedding )

हेही वाचा : Video : अल्लू अर्जुनला अटक; मेगास्टार चिरंजीवी पत्नीसह पोहोचले अभिनेत्याच्या राहत्या घरी, व्हिडीओ आला समोर

किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) ‘लागिरं झालं जी’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. दोन्ही मालिकांमध्ये त्याच्या भूमिका खलनायकाच्या असल्या तरीही, किरणने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकून घेतलं. किरण आणि वैष्णवी यांनी एकत्र ‘देवमाणूस २’ मालिकेत काम केलं होतं. वैष्णवी सुद्धा मालिकाविश्वात सक्रिय आहे. सध्या ती ‘तिकळी’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

दरम्यान, किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नसोहळा उद्या ( १४ डिसेंबर ) पार पडणार आहे. या दोघांनी प्रेमाची जाहीर कबुली दिल्यापासून त्यांच्यावर मनोरंजन विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकार किरण-वैष्णवीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader