Kiran Gaikwad Inside Wedding Video : ‘देवमाणूस’, ‘लागिरं झालं जी’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला. अभिनेत्याची पत्नी सुद्धा कलाविश्वात सक्रिय आहे, तिचं नाव आहे वैष्णवी कल्याणकर. सध्या ‘तिकळी’ या मालिकेत ती मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. किरण-वैष्णवीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. यानंतर या जोडप्याचा साखरपुडा ( १३ डिसेंबर ) आणि विवाहसोहळा १४ डिसेंबरला कोकणात थाटामाटात पार पडला.
किरण-वैष्णवीच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित होते. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत झळकलेले बहुतांश कलाकार किरणच्या ( Kiran Gaikwad ) लग्नासाठी कोकणात पोहोचले होते. निखिल चव्हाण, सागर चव्हाण, महेश जाधव, राहुल मगदूम, पूर्वा शिंदे, ओंकार ढगे, अभिनव कुराणे या कलाकारांनी किरण-वैष्णवीच्या लग्नात धमाल केल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय निर्माता तेजपाल वाघ, सुमीत पुसावळे, नितीश चव्हाण, श्वेता शिंदे ही मंडळी सुद्धा किरणच्या लग्नात उपस्थित होती. याचा Inside व्हिडीओ टॅलेंटने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा : Video: शिवानी सोनार लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नात घालणार पणजीची नथ; म्हणाली, “जुने आणि पारंपरिक दागिने…”
‘लागिरं झालं जी’ मालिकेत टॅलेंटची भूमिका अभिनेता महेश जाधवने साकारली होती. टॅलेंट आणि भैयाची ( किरण ) जुगलबंदी मालिकेत चांगलीच गाजली होती. टॅलेंट, निखिल चव्हाण, राहुल मगदूम हे कलाकार गाडीने कोकणात पोहोचले होते. मंडपात येताच या कलाकारांनी किरणला पाहून डान्स करायला सुरुवात केली होती. यानंतर टॅलेंटच्या लाडक्या भैयाची हळद पार पडली. लग्नाच्या वरातीत नवरदेव घोड्यावरून येताच सगळ्या कलाकारांनी एकच जल्लोष केला होता.
महेश जाधव आणि पूर्वा शिंदे यांनी किरण-वैष्णवीच्या लग्नात बँजो देखील वाजवला. याचा मिनी Vlog स्वरुपातील व्हिडीओ शेअर करत टॅलेंटने याला, “भैयाच्या लग्नात घातला राडा” असं कॅप्शन दिलं आहे. महेश जाधवने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “नादखुळा… टॅलेंटचा ब्लॉग”, “खूपच छान”, “एक नंबर जोडी” अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा : Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा कायम! जगभरातील कमाई १४०० कोटींहून जास्त, अनेक चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड्स
दरम्यान, किरण गायकवाड ( Kiran Gaikwad ) आणि वैष्णवी कल्याणकर यांचा लग्नसोहळा १४ डिसेंबरला कोकणात थाटामाटात पार पडला आहे. या दोघांनी एकत्र ‘देवमाणूस २’ मध्ये काम केलं होतं. ही रील लाइफ जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याने सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत.