‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. अतिशय वादग्रस्त असलेला हा शो घराघरात तितक्याच आवडीने पाहिला जातो. या पर्वामध्ये विविध क्षेत्रातील १६ कलाकार सहभागी झाले होते. त्यात नुकतेच या पर्वाचे पाहिले एलिमिनेशन पार पडले. यावेळी निखिल राजेशिर्के हा बिग बॉसच्या चौथ्या पर्वातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक ठरला. या पर्वाचा तिसरा आठवडा आता सुरु झाला आहे. त्यामुळे यातील टास्कमुळे मित्रांमध्येही आता वादाची ठिणगी पडू लागली आहे.

आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली; ‘पुष्पा द रुल’च्या चित्रीकरणाला सुरुवात, फोटो शेअर करत रश्मिका म्हणाली…

किरण माने आणि विकास सावंत हे दोघे बिग बॉस मराठीच्या घरात अगदी सुरुवातीपासून एकत्र. कितीही कोणी त्यांच्या विरोधात बोले, विकासला किरण माने यांच्याबाबत सांगितले तरीदेखील यांची मैत्री तुटली नाही. एकमेकांच्या साथीने त्यांनी आजवरचा प्रवास पूर्ण केला. पण, आज मात्र त्यांची मैत्री तुटणार असं वाटतं आहे.

नुकताच ‘बिग बॉस ४’च्या नवीन भागाचा प्रोमो आउट झाला. यात विकासने किरणला खडसावुन सांगितले, “आता मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही तिथे माझ्यासाठी उभे पण नाही राहिलात.” त्यावर किरण माने म्हणाले, “आता मला एकटं व्हायचे आहे.” किरण माने यांच्या या म्हणण्यावर विकास दुखावला गेला. तो म्हणाला, “दादा मला वाईट वाटतं आहे तिथे कोण नव्हतं तुम्ही होते.” त्यावर किरण म्हणाले, “राग काढ माझ्यावर स्वतःला त्रास करून नको घेऊस.” या संभाषणाच्या वेळी विकासला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 4: कुटुंबियांच्या आठवणीत अमृता धोंगडेला अश्रू अनावर, म्हणाली, “इथे सगळेच…”

दरम्यान बिग बॉस मध्ये ‘ऑल इज वेल’ ही या नव्या पर्वाची थीम आहे. तर आधीच्या पर्वांप्रमाणेच महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यापासूनचे या घरात भांडणाचे आणि मतभेदांचे सूर लागलेले पाहायला मिळाले होते. तर त्यामुळे पुढे या स्पर्धेत काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Story img Loader