केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. मध्यंतरी तिने शरद पवारांबाबत एक पोस्ट लिहिली होती. ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी केतकी चितळेने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो पोस्ट केला आणि हिंदू राष्ट्राची मागणी केली होती. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि महायुती सरकारवर चांगलीच आगपाखड केल्याचं दिसतं आहे. त्या व्हिडीओवर किरण मानेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
केतकी चितळेने व्हिडीओत काय म्हटलंय?
“देशात मोर्चे काढले जात आहेत. वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी होते आहे. पण तुम्ही वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये दिलेत. तुम्हाला आता हिंदूही नकोयत का? हे ठरवलं आहे का? तिघांपैकी एक जण काकांकडे परतणार, हातापाया पडत मला परत घ्या म्हणणार आहे. एक जण राजीनामा देतोय पण तो घेतला जात नाही. तीन चाकांची रिक्षा चालवली जाते आहे. विधानसभेत तुम्ही पराभूत व्हायचं ठरवलंय का? ” असा प्रश्न केतकीने व्हिडीओत विचारला आहे.
“एका मोर्चा धारक ‘महापुरुषांनी’…”, अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत
केतकीचा हा व्हिडीओही चर्चेत
केतकीचा हा व्हिडीओ चर्चेत आला त्यानंतर किरण माने यांनी पोस्ट लिहिली आहे. काही दिवसांपूर्वी केतकी चितळेच्या घरी मराठा सर्वेक्षणासाठी महिला कर्मचारी आली होती. त्यांनी केतकीला जात विचारली. ज्यावर मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे असं म्हटलं होतं. हाच संदर्भ देत केतकी चितळेला प्रश्न विचारला आहे.
हे पण वाचा- किरण मानेंची पोस्ट चर्चेत, “…आणि ब्राह्मण्यवादावर धम्माने नेत्रदीपक विजय मिळवला”
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
किरण मानेंनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे, त्यात ते म्हणतात; “ताईच्या दारात महानगरपालिकेची कर्मचारी भगिनी गेली होती तेव्हा ताईने तिला जात विचारली होती. मी मराठा असं त्या भगिनीने सांगितल्यावर ताई म्हणाली होती मी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहे. मग ताई अचानक हिंदू कशी झाली?” असा सवाल किरण मानेंनी विचारला आहे. ज्यावर लोक चांगलेच प्रतिक्रिया देत आहेत.
तुम्ही संघाला तोडलं, आता सनातनी लोकांना तोडताय असे केतकीने म्हटले. निवडणुकीत आपण नोटा या पर्यायाच्या विरोधात होतो. आता मात्र, तिघाडी सरकार तुमच्यामुळे नोटाला मतदान करावं लागणार असल्याचे हताश उद्गगार केतकी चितळे काढले. बंगालमध्ये ममता दीदी बांगलादेशींना बोलावत आहे, आता तुम्ही रोहिंग्याना मुंबईत वसवा… तुम्ही मुस्लिम राष्ट्र घोषित करा ना..कोणाची वाट पाहताय….महाराष्ट्राचे नामांतर करा…अशा शब्दात केतकीने आपला संताप व्यक्त केला. आता किरण माने यांनी केतकीला सवाल केला आहे. ज्याबाबत केतकी उत्तर देणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.