अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट या कायम व्हायरल होतं असतात. सध्या ते ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘तिकळी’ मालिकेत पाहायला मिळत होते. पण त्यांनी या मालिकेला आता रामराम केल्याचं समोर आलं आहे. किरण मानेंनी स्वतः यासंदर्भात पोस्ट लिहून चाहत्यांना माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ जुलैपासून ‘तिकळी’ मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर सुरू झाली होती. या मालिकेत किरण मानेंनी बाबाराव खोत ही खलनायकाची भूमिका साकारली होती. पण आजपासून ‘तिळकी’ मालिकेत किरण माने दिसणार नाहीत. लवकरच ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – Video: ७० दिवसांतच ‘बिग बॉस मराठी’ बंद होणार असल्याच्या चर्चेवर सोनाली पाटीलने व्यक्त केली नाराजी, म्हणाली, “चांगला टीआरपी असताना…”

किरण माने पोस्ट करत म्हणाले, “…खतरनाक, खूंखार, कारस्थानी ‘बाबाराव खोत’ला रामराम…आजपासून मी ‘सन मराठी’ वाहिनीवरच्या ‘तिकळी’ मालिकेत नसेन. पण ही भूमिका मला खूप समाधान देऊन गेली. ‘कलर्स मराठी’वरच्या ‘सिंधुताई’मधला प्रेमळ, मायाळू, कणखरपणे मुलीच्या पाठीशी उभा राहिलेला अभिमान साठेसारखा भक्कम बाप साकारल्यानंतर एकदम विरुद्ध धाटणीचा खलनायक बाबाराव साकारायला मिळाल्यामुळे माझ्यातला अभिनेता सुखावून गेला.”

हेही वाचा – Wildcard संग्राम चौगुले अवघ्या १४ दिवसांत घराबाहेर! ‘हे’ आहे कारण; नेटकरी म्हणाले, “अरबाजला वाचवायला…”

पुढे किरण माने यांनी लिहिलं की, आता पुन्हा एकदम भिन्न स्वभावाच्या नव्या भूमिकेत येतोय लवकरच…आपल्या आवडत्या ‘कलर्स मराठी’वर…’बिग बॉस’पासून ‘कलर्स मराठी’ हे मला घरासारखे आहे…घरी परतल्याचा आनंद वेगळाच असतो.”

हेही वाचा – “हे औदार्य महागात पडेल…”, पाकिस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनाला राज ठाकरेंचा विरोध, थेट थिएटर मालकांना दिली ताकीद

हेही वाचा – श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यांत घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्याने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाला, “अत्यंत वेदनादायी…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’ने शनिवारी २१ सप्टेंबरला नव्या मालिकेची घोषणा केली. ‘लय आवडतेस तू मला’ असं ‘कलर्स’च्या नव्या मालिकेचं नावं आहे. या मालिकेत ‘लवंगी मिरची’ फेम अभिनेता तन्मय जक्का आणि सानिका मोजर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल झन्नाट, रांगडी प्रेमकथा ‘कलर्स’च्या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे. याच मालिकेत किरण माने झळकणार की दुसऱ्या? हे येत्या काळात समोर येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane exit from tikali serial now appear new colors marathi serial pps