सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची हवा आहे. या कार्यक्रमामध्ये दररोज नवनवे ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. कामावरुन होणारे मतभेद, टास्कदरम्यानची भांडणं, वाद अशा गोष्टीमुळे यंदाचे पर्वही गाजत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या आगळ्यावेगळ्या खेळीमुळे अभिनेते किरण माने खूप चर्चेत आले आहेत. विकास सावंत आणि २-३ सदस्य सोडल्यास उरलेले सर्वजण त्यांच्या विरोधामध्ये आहेत असे चित्र सध्या दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण माने सोशल मीडियावर प्रामुख्याने फेसबुकवर सक्रिय आहेत. सातारा स्टाईल भाषेमध्ये ते वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. या प्लॅटफॉर्मवर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. अशाच एका पोस्ट्समुळे ते काही महिन्यांपूर्वी चर्चित आले होते. याच मुद्द्यावरुन किरण माने अडचणीतही आले होते. आज जवाहरलाल नेहरु यांची जयंती आहे. देशभरामध्ये हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. किरण माने यांनीही या निमित्ताने त्यांचा जुना फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – “…म्हणून मी तुमची आई होत नाही”; माजी पॉर्नस्टार मिया खलिफा संतापली

या फोटोमध्ये चार मुलं उभी आहेत. त्यांनी या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फोटोवर ‘तुमच्या लाडक्या किरणला ओळखा’, असे लिहिले आहे. चाहते फोटोवर कमेंट करत त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या फोटोवर ‘तुका आशेचा किरण’ असेही लिहिले आहे. याचा उल्लेख त्यांनी हॅशटॅग्समध्येही केला आहे. “कवडसा बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”, असे कॅप्शन या फोटोला त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा – Video: आधी एकमेकांचा गळा धरला आणि मग…; प्रार्थना बेहरेने नवऱ्याबरोबर पोस्ट केलेल्या व्हिडीओने वेधलं लक्ष

बिग बॉसमध्ये दररोज नवनवे ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. कामावरुन होणारे मतभेद, टास्कदरम्यानची भांडणं, वाद अशा गोष्टीमुळे यंदाचे पर्वही गाजत आहे. कालच्या भागामध्ये सर्वात कमी मत मिळाल्यामुळे रुचिरा जाधव घराबाहेर पडली. तिच्या व्यतिरिक्त प्रसाद, यशश्री, अमृता धोंगडे आणि स्नेहलता हे सदस्य डेंजर झोनमध्ये होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane has posted old photo on facebook on occasion of childrens day yps