प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यापासून किरण माने यांच्या नावाची चर्चा सातत्याने आहे. घरातील सदस्यांच्या मते किरण माने हे सर्वात धूर्त खेळाडू आहेत. काही सदस्यांनी तर उघड- उघड हे बोलूनही दाखवलं आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये ते स्वतःची वेगळी योजना आखतात आणि त्यानुसार खेळताना दिसतात. नुकताच बिग बॉसच्या घरात एक टास्क देण्यात आला होता ज्यात किरण माने यांनी एक कविता सादर केली.

किरण माने यांनी नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये बिग बॉसच्या घरातील सदस्यांसमोर गर्लफ्रेंडसाठीची कविता सादर केली. त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्या या व्हिडीओला चाहते आणि युजर्सचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा व्हिडीओ कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.
आणखी वाचा- Video : “हॅलो ललिता आपले कुटुंब ज्या वेदनेतून…” पत्नीशी संवाद साधताना किरण माने भावूक

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…

कलर्स मराठीने किरण माने यांचा हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘प्रेयसीचं लग्न ठरल्यावर प्रियकराची होणारी अवस्था, किरण माने यांनी कवितेच्या माध्यमातून सदस्यांसमोर मांडली’ किरण माने यांनी या कवितेचं अप्रतिम सादरीकरण केलं. त्यांनी सादर केलेल्या या कवितेला घरातील सदस्यांनीही तेवढाच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या कवितेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

किरण माने यांची कविता…

अगं आयुष्यातलं सुख सारं तुझ्यामागून पेरलं
असं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं
अगं मी- मी म्हणणारं माझ्यापुढे हरलं
तुझ्यासाठी कित्येकांना चितपट मी मारलं
तवा होतं फकस्त मलाच तू वरलं
मग सांग तुझं डोळं असं कशानं गं फिरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं

नगं सांगू काय आता सारं मला समजलं
वाटलं होतं सोनं पण पितळच निपाजलं
अगं तुझ्या साखरपुड्याचं पेढं तुझ्या भावानंच मला चारलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं

साखरेचं पेढं मला मिठासारखं वाटलं
न झोपताच डोळं माझं आपोआप मिटलं
वाटलं, तुझ्या वरातीचं घोडं माझ्या उरावरून फिरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं

आयुष्यातलं सुख सारं तुझ्यामागून पेरलं
आसं कसं अवचित सखे लगीन तुझं ठरलं

किरण माने यांच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून त्यांच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘काय माने किती मस्त… सुपर से उपर’ दुसऱ्या एका युजरने, ‘कडक माने सर’ अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने ‘फक्त मानेच हा सीझन जिंकू शकतात, आजचा परफॉर्मन्स तर कमाल’ अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा- “अब्रूची लक्तरं टांगली गेली, पण…” किरण माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे. पण या सगळ्यात किरण माने यांनी मात्र प्रेक्षकांवर स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.

Story img Loader