अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने आजकाल नेहमी चर्चेत असतात. शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते सत्ताधाऱ्यांवर सातत्याने सडेतोड टीका करताना दिसतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले किरण माने एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. यासंदर्भात त्यांनी नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

याआधी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘कलर्स मराठी’च्या मालिकेत किरण माने झळकले होते. ‘सिंधुताई माझी माई’ असं त्या मालिकेचं नाव होतं. या मालिकेत किरण माने यांनी सिंधुताईच्या आयुष्यातला बापमाणूस अभिमान साठे यांची भूमिका साकारली होती. पण ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेनं अवघ्या आठ महिन्यांतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. १५ ऑगस्ट २०२३पासून सुरू झालेल्या ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले. पहिल्या पर्वात गोष्ट चिंधीची दाखवली. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून ‘चिंधी बनली सिंधु’ हे दुसरं पर्व सुरू झालं. पण मालिकेला प्रेक्षकांचा तितकास प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे वाहिनीनं मालिका ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च २०२४ला ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला.

Kiran Mane Post About Shahu Maharaj
“तुम्ही जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, लायकी..”, शाहू महाराजांबाबत किरण मानेंनी केलेली पोस्ट व्हायरल
What Kiran mane Said About Ketki Chitale?
केतकी चितळेला किरण मानेंचा सवाल, “अभिमानाने ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ जात सांगणारी ताई आता हिंदू..”
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल
marathi actor Abhijeet Shwetchandra exit form shubhvivah marathi serial
‘शुभविवाह’ मालिकेतून अचानक ‘या’ अभिनेत्याची एक्झिट, आता ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेता झळकला ‘या’ भूमिकेत
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग
nana patekar talks about wife neelkanti patekar
“तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले…

हेही वाचा – Video: नीता अंबानींनी मुलाच्या लग्नासाठी वारासणीतून खरेदी केली साडी, सोन्या-चांदीचे वर्क असलेल्या साडीची किंमत जाणून घ्या

‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेनंतर आता किरण माने नव्या मालिकेत झळकणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवर ‘तिकळी’ नावाची नवी मालिका १ जुलैपासून सुरू होतं आहे. याचं मालिकेत किरण माने नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर, पूजा ठोंबरे, पार्थ घाटगे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या नव्या मालिकेत किरण माने रणजीत खोत ही भूमिका साकारणार आहेत. या मलिकेचा प्रोमो शेअर करत किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे.

किरण मानेंची पोस्ट वाचा…

…एकापाठोपाठ एक पूर्णपणे वेगळ्या धाटणीच्या भूमिका करायला मिळणं हे अभिनेत्यासाठी निव्वळ सुख. नुकतीच सिंधुताईंसारखं व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी जीवाचं रान करणार्‍या, रक्ताचं पाणी करणार्‍या अतिशय हळव्या, स्वाभिमानी अभिमान साठेची भूमिका साकारली होती…पाठोपाठ लगेच एका भन्नाट, जबराट, खतरनाक भूमिकेत तुमच्यासमोर येतोय. अत्यंत निर्दयी, क्रूर, अंधश्रद्धाळू असा बाबाराव उर्फ रणजीत खोत…१ जुलैपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता… ‘सन मराठी’वर बघायला विसरू नका….आणि हो, बाबाराव उर्फ रणजीत खोत अंधश्रद्धाळू असला तरी मालिका ‘तिकळी’ या अंधश्रद्धेच्या विरोधातली आहे. नक्की बघा.

हेही वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शक समीर विद्वांस यांना लागली हळद, फोटो आले समोर

किरण माने यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. “लय भारी”, “आतुरता आहे तुमच्या अभिनयाची”, “अभिनंदन”, “शुभेच्छा दादा”, “वाह” अशाप्रकारच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.