‘बिग बॉस मराठी’ हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. येत्या ८ जानेवारीला या पर्वाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व हे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. बिग बॉस मराठीच्या घरातील किरण माने आणि राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन बिग बॉसला ट्रोल केले जात आहे.

बिग बॉस मराठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत किरण माने हे लाल रंगाच्या नेलपेंटने एका प्लेटवर RK असे इंग्रजी लिहिली आहे. त्यावेळी अपूर्वा ही प्रिय राखी असे लिहिताय का असे विचारते. त्यावर किरण माने हे मी RK असं लिहितोय, पण ते खरंतर RM असं हवंय म्हणजे ते राखी माने असं होईल. त्याबरोबरच किरण मानेंनी त्या प्लेटच्या मागे हार्ट शेप काढून राखी आणि किरण असे लिहिले आहे. राखी आणि किरण यांचा हा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा : Video: किरण माने राखी सावंतच्या प्रेमात? लाल रंगाच्या नेलपेंटने प्लेटवर लिहिलं RK अन्…

राखी आणि किरणचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण त्यावरुन ट्रोल करत आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केला आहे. “सगळं तुम्ही फक्त टीआरपीसाठी करताय, लोकांच्या हुनरला इथं value नाहीये फक्त तुम्हाला तुमच्या मनाचे लोक पुढ घेऊन जायचेत . ते voting बंद करा पहिल”, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर “एकाने बंद करा रे हा फालतू पणा अजून किती लोकांना हे दाखवून फसवणार”, असे म्हटले आहे. तर एकाने ‘निव्वळ मूर्खपणा’ असे म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुनिषाची आत्महत्या, भीतीचं वातावरण अन्…”, पाच दिवसांनी मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

दरम्यान यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.