‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सर्वाधिक चर्चा रंगली. अक्षय केळकर या पर्वाचा विजेता ठरला. पण त्याचबरोबरीने ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्य चर्चेचा विषय ठरले. त्यातीलच एक सदस्य म्हणजे किरण माने. किरण यांनी उत्तम खेळी खेळत टॉप तीनमध्ये स्थान मिळवलं. थोडक्यात ते ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीपासून दूर राहिले. आता त्यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – द्विशतक झळकावणाऱ्या शुबमन गिलच्या अफेअरच्या चर्चा, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीला करतोय डेट?

Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
Bigg Boss 18 Karanveer Mehra poking to chahat pandey on relationship
Bigg Boss 18: करणवीर मेहराने रिलेशनशिपवरून चाहत पांडेला…
Rohit Roy recalls surprising daughter Kiara
अमेरिकेत शिकतेय प्रसिद्ध अभिनेत्याची एकुलती एक लेक; म्हणाला, “मी २० तास प्रवास करून गेलो अन् ती…”
Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor wedding
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये झळकलेल्या अभिनेत्याने बांधली लग्नगाठ! पत्नी सुध्दा आहे अभिनेत्री, ‘या’ लोकप्रिय मालिकेत केलंय काम
Bigg Boss 18 kashish Kapoor slam on Shilpa Shirodkar
Bigg Boss 18: “हीच तोंडपण बघायचं नाही…”, घराबाहेर येताच कशिश कपूरची शिल्पा शिरोडकरवर टीका, म्हणाली…
Hansika Motwani sister in law Muskan Nancy James files police complaint
हंसिका मोटवानीसह तिच्या आई अन् भावाविरोधात अभिनेत्री वहिनीची पोलीस तक्रार, तीन वर्षांपूर्वी झालंय लग्न
Amruta Deshmukh
अमृता देशमुखने वहिनी कृतिका देवबरोबर शेअर केला व्हिडीओ; पती प्रसाद जवादे कमेंट करत म्हणाला…
Marathi Actress Samruddhi Kelkar social media post
हातात हिरवा चुडा, मेहंदी अन्…; ‘फुलाला सुगंध मातीचा’ फेम समृद्धी केळकरची लक्षवेधी पोस्ट; म्हणाली, “लवकरच…”
Akshaya Hindalkar
दीड वर्ष चालता येत नव्हतं, हातातली मालिका गेली अन्…; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ फेम अभिनेत्रीचा झालेला अपघात, म्हणाली…

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये प्रवेश करताना किरण मानेंची ओळख सांगणारा एक व्हिडीओ या शोमध्ये दाखवण्यात आला. तोच व्हिडीओ त्यांनी फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. तसेच हा व्हिडीओ पुन्हा पाहिल्यानंतर किरण यांना स्वतःचा अभिमान वाटत आहे. त्यांनी या व्हिडीओबरोबर खास पोस्ट लिहिली आहे.

किरण म्हणाले, “आग्ग्गाय्याय्यायाया… काय भन्नाट बनवलाय राव ह्यो व्हिडीओ. नादखुळा…पयल्या दिवशी बिग बॉसच्या घरात जाताना महेश मांजरेकरांनी खतरनाक ओळख करुन देत ह्यो सुरु केला आन् अंगावर काटा आला भावांनो…शंभर हत्तींचं बळ आलं. कलर्स मराठीमधल्या ज्यांनी कुनी यासाठी कष्ट घेतले त्या सगळ्यांना कडकडीत सलाम!”

आणखी वाचा – Video : कुणी मारली मिठी, कुणी घातला फुलांचा हार, किरण मानेंना भेटण्यासाठी साताऱ्याच्या रस्त्यांवर तुफान गर्दी

“जे बोललो ते करूनच बाहेर आलो. खेळातला समदा विरोध झुगारुन शंभर दिवस खनखनखनखनखन नाणं वाजवलं. होती नव्हती ती सगळी ताकद लावली. कशाची पर्वा न करता खरंखुरं वागलो. नो आडपडदा. काय हुईल ते हुईल. पन जे हाय ते हाय! बाहेर तुम्हा सगळ्यांची मनं जिंकू शकलो. भरुन पावलो. आल्यापास्नं अख्ख्या महाराष्ट्रातनं प्रेमाचा, मायेचा वर्षाव चाल्लाय. लोक घर शोधत येतायत. हारफुलांनी घर भरुन गेलंय. अजून काय पायजे भावांनो? आनंदाचे डोही आनंद तरंग…” किरण मानेंनी शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी किरण मानेंचं कौतुक केलं आहे.

Story img Loader