मराठी ‘बिग बॉसचे पाचवे पर्व’ पहिल्या आठवड्यापासूनच रंगताना दिसत आहे. स्पर्धकांमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसात भांडणाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामधील भांडण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

बिग बॉसच्या मागील पर्वातील स्पर्धकांनी आपले मत नोंदवायला सुरुवात केली असून निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यात झालेल्या भांडणानंतर पुष्कर जोगने निक्की तांबोळी मोठ्यांशी कसे वागायचे माहित नाही. अशा आशयची सोशल मीडियावर पोस्टदेखील शेअर केली होती. आता या सगळ्यात बिग बॉस ४ मध्ये सहभागी झालेले अभिनेता किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते कोणत्या स्पर्धकांना पाठिंबा देणार याविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

किरण माने सोशल मीडियावर घन:श्याम, सूरज आणि धनंजय पोवार यांचे फोटो शेअर करत लिहिले आहे, “हे तिघेजण कसेही खेळले, समजा यांनी मूर्खपणा केला तरी माझं प्रेम आणि पाठिंबा या तिघांनाच असणार आहे. कारण- हे तिघेही गावच्या मातीतील आहेत. यांनी शहरी सभ्यता-असभ्यता, संस्कृती, शुद्ध-अशुद्धता या सगळ्यांना बाजूला करुन त्यांनी खरं वागून लोकप्रिय झाले आहेत आणि इथेपर्यंत पोहचले आहेत. बिग बॉसच्या घरात ते जे काही वागतील, ते खरंच वागतील. यांच्याविषयी मला आदर आहे आणि त्यांनादेखील माझ्याविषयी आदर आहे. ते ज्या पद्धतीचे रील्स बनवतात, ते मला कधीच जमणार नाही. मी जे अभिनयात, परिवर्तन चळवळीत आणि राजकारणात एकाचवेळी जे काही करतोय ते मनोरंजन इंडस्ट्रीत नव्याजुन्या कोणालाच जमणार नाही.” असेही त्यांनी म्हटले आहे.

“बिग बॉस माझ्यासाठी गॉडफादर”

किरण माने यांनी आपला बिग बॉसचा प्रवासदेखील या पोस्टमध्ये शेअर केला आहे. ते म्हणतात, “बिग बॉस वाघाला वाघ आणि माकडाला माकड म्हणूनच दाखवतात. विशेषत: ग्रामीण भागातली जनता पहिल्यांदा बिग बॉसकडे वळली आणि मला अभूतपुर्व प्रेम दिले. माझ्याहून निम्म्या वयाच्या पोरांना मागे टाकत थेट टॉप तीन पर्यन्त मजल मारू शकलो. गावोगावी मिरवणुका निघाल्या. ‘बिग बॉस पब्लिक विनर किरण माने’ अशा रांगोळ्या काढल्या गेल्या. बिग बॉसच्या घरातही मी रोज एक तुकाराम महाराजांचा अभंग अर्थासहित सांगणे. गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, ज्याेतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गोष्टी सांगण्यासारख्या जगावेगळ्या गोष्टी केल्या. हे बिग बॉसमध्ये कधीच घडले नव्हते आणि खात्रीने सांगतो, यापुढेही हे घडणार नाही.” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: आमिर खानला आलेले मुलाचे टेन्शन! म्हणाला, ‘जुनैदच्या बॉलीवूड पदार्पणावेळी…”

शेवटी आपल्या पोस्टमध्ये घन:श्याम, सूरज आणि धनंजय पोवार यांना बिग बॉसमध्ये खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.