‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतून अचानक झालेल्या एक्झिटनंतर किरण माने अधिक प्रसिद्धीझोतात आले. त्यानंतर त्यांनी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून प्रक्षेकांचं चांगलंच मनोरंजन केलं. सध्या ते वेगवेगळ्या विषयांवर लिहिताना दिसतं आहे. किरण मानेंनी नुकतीच बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानसाठी एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
किरण मानेंनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मानेंनी शाहरुखचे कौतुक करत त्याची एक सवय सांगितली आहे. किरण मानेंच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.
किरण मानेंची पोस्ट
“न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं… त्यानं जग जिंकलं ! ❤️
परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, ‘सलाम’ करतो… आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक ‘प्युरीफायर’ आहेत. लब्यू SRK.”
दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.