मराठी अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ‘बिग बॉस’ सीझन ४ मध्ये सहभागी झाल्यापासून ते घराघरांत पोहोचले. ‘बिग बॉस’च्या घरात त्यांनी ‘सातारचा बच्चन’ अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. किरण मानेंनी अनेकदा माझी जन्मभूमी सातारा असल्याचे अभिमानाने सांगितले आहे. याच लाडक्या सातारा शहरासाठी त्यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “तू गे आहेस ना?”, विचारलेल्या प्रश्नावर करण जोहरने दिले थेट उत्तर; म्हणाला, “तुला माझ्यात…”

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”

किरणा मानेंनी कामानिमित्त वारंवार मुंबई-सातारा-मुंबई असा प्रवास करावा लागत असल्याचे पोस्टच्या सुरुवातीला म्हटले आहे. मात्र, कितीही प्रवास केला, कामानिमित्त मुंबईला राहिलो तरीही सातारा शहर कधीच सोडणार नाही असे त्यांनी सांगितले. साताऱ्यामधील प्रत्येक जागेच्या आठवणी, त्यांच्या भावना किरण मानेंनी या पोस्टमधून मांडल्या आहेत.

किरण माने यांची पोस्ट…

…लोकं म्हन्त्यात “सारखं शुटिंगसाठी मुंबई-सातारा-मुंबई.. कशाला यवढी दगदग करत असता? मुंबईत शिफ्ट व्हा की फॅमिली घेऊन.”

खरंतर मुंबै लै आवडती. नाटका-सिनेमात रमनारी ! जगातलं हे एकमेव शहर असं आसंल, जिथं रोज, कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्यातरी नाटकाचा प्रयोग अस्तो. कुठं ना कुठं, कस्लं ना कस्लंतरी शुटिंग सुरू आस्तं. कस्लं भारीय हे !

पन सातारा म्हंजी काळजाचा तुकडा हाय आपल्या. गेली दहा वर्ष मी नाटक-सिनेमा सिरीयलनिमित्तानं हळूहळू मुंबैत बिझी होत गेलो. पन शुटिंग-नाटकाचं प्रयोग करून परत सातारला येताना लिंबखिंडीतनं सातार्‍याकडं बघितल्यावर जे वाटतं मला, ते शब्दांत नाय सांगू शकत..

…माझ्या घराशेजारी भक्कम पाय रोवून माझ्या पाठीशी उभा असलेला अजिंक्यतारा.. म्हैन्यातनं एकदातरी हाक मारून बोलवून घेनारं कास पठार.. आस्तीक असो नायतर नास्तिक, अस्सल सातारकर एकातरी श्रावनी सोमवारी यवतेश्वरला आनि दिवाळीत पयल्या अंघोळीला खिंडीतल्या गनपतीला जातोच.. कधीमधी सज्जनगडावर जाऊन तिथल्या महाप्रसादाची चव चाखतोच ! पावसाळ्यातल्या ठोसेघरपुढं स्कॉटलंड आन युरोप झक मारंल राजेहो !! कधी मन उदास झालं तर माहूलीला कृष्ना-वेन्नेच्या संगमावर जाऊन वहात्या पान्याकडं एकटक बघत बसायचं. मूड फ्रेश असला तर कन्हेर डॅमवर चक्कर मारायची… काय-काय सांगू !

कधी वरच्या रोडवरनं राजवाड्यावर जाऊन खालच्या रोडवर्न परत पोवई नाक्यावर आलं तर आख्खं सातारा भेटतं… दोस्तलोकं हाक मारत्यात “ऐ किरन्या भावा…लै मोट्टा ॲक्टर झालास.. आमाला इसारला न्हायस ना? ये की घरी रैवारी मटन खायाला.” बास. आजून काय पायजे? मुंबै बापासारखी असली तरी सातारा आईसारखी माया करतं माझ्यावर… आपल्या आईला सोडुन कधी कुनी जातं का?
म्हनूनच, मुंबैत काम करायला शंभर हत्तींचं बळ देनारा माझा सातारा आपन कधीच सोडनार नाय गड्या…

-किरण माने.

सातारा शहरासाठी शेअर केली खास पोस्ट

हेही वाचा : “आयुष्यातील पहिले कथक नृत्य…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

नेटकऱ्यांनी केले कौतुक
नेटकऱ्यांनी केले कौतुक

दरम्यान, किरण मानेंनी साताऱ्याबद्दल शेअर केलेली ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. एका युजरने, “तुमची पोस्ट पाहून डोळ्यात पाणी आले” अशी प्रतिक्रिया अभिनेत्याला दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात” अशी कमेंट त्यांच्या पोस्टवर केली आहे.