किरण माने हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून घराघरात पोहोचलेल्या किरण मानेंनी अनेक नाटक व मालिकांमध्येही काम केलं आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट व वैयक्तिक जीवनातील अनेक किस्से ते पोस्टद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.
किरण मानेंच्या अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. सदरा, उपरणं, डोक्यावर टोपी व कपाळावर टीळा असा वारकरी वेशातील फोटो मानेंनी शेअर केला आहे. याबरोबरच त्यांनी खास पोस्टही लिहिली आहे.
हेही वाचा>> “१५ लोकांनी महिनाभर रोज बलात्कार…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य, म्हणाली, “प्रेमात…”
किरण मानेंची पोस्ट
‘वारी’ ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तन परंपरा सुरू केली नाय. माणसामाणसांतले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो. याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा!
संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबतात. तिथले मुस्लीम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करतात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजतात. मुस्लीम बांधवांकडून आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं.
विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं! ज्यावेळी मुस्लीम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेतात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करतात!! एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मजारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.
ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपासून आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला…तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यंत आणली. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं हाय…
हेही वाचा>> राधे माँच्या लेकाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याबरोबर करणार काम
किरण मानेंची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, बिग बॉस मराठीनंतर किरण माने चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. रावरंभा या ऐतिहासिक मराठी चित्रपटात माने हकीम चाचा ही भूमिका साकारताना दिसणार आहेत.