आतापर्यंत अनेक मालिका, नाटकं, चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत किरण माने प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. किरण माने यांना ‘बिग बॉस मराठी ४’ने वेगळी ओळख दिली. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. किरण मानेही सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. ते नेहमीच त्यांना आवडलेल्या किंवा खटकणाऱ्या गोष्टींबद्दल सोशल मीडियावरून व्यक्त होत असतात. तर आता त्यांच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्या पोस्ट मधून त्यांनी त्यांच्या एका फेसबुक फ्रेंडबद्दल कौतुक व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरण माने यांनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला. त्या व्यक्तीकडे असलेल्या बीएमडब्ल्यूच्या नेमप्लेटवर ‘जय भीम’ असं लिहिलं आहे. हा फोटो शेअर करत किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा : “चांगल्या भूमिकांची माती…,” किरण माने यांची पोस्ट चर्चेत

काय आहे किरण माने यांची पोस्ट?

‘जयभीम’… कसं थाटात आन् टेचात ल्हिवलंय नंबरप्लेटवर. ऑस्ट्रेलियात र्‍हानार्‍या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू हाय ही भावांनो ! मला आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर ह्यो नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहीलीवती, ‘बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो.’… क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघनार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हन्ला, ‘तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला.’

अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून नांव कमावतोय. तिथंच स्थायिक झालाय. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय… ऐश्वर्यसंपन्न झालाय… पन तरीबी आपली पाळंमुळं इसरलेला नाय. आपल्या शिक्षनाचा पाया ज्याच्यामुळं घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. ‘आपन खातो त्या भाकरीवरच नाय, तर ब्रेड-बटर, पिझ्झा-बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय’ याची जानीव ठेवलीय.

हे प्रेम फक्त गाडीवर ‘जयभीम’ ल्हीन्यापुरतं नाय बरं का… आपल्यापैकी बर्‍याचजनांना वाटंल, त्यात काय विशेष? लै जन अशी महामानवांची नांवं गाडीवर लिहीत्यात. म्हनून त्यापुढं जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आन् नंतर खर्‍या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनबी अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार पोरांना हेरून, त्यांना करीयर गायडन्स करनं… उच्च शिक्षनासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवुन देनं, अशी कामं मनापास्नं आनि आनंदानं करतो हा आपला दोस्त !

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे ‘खरेखुरे’ विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊदेत… कुठल्याही प्रांतात जाऊदेत… कुठल्याही देशात जाऊदेत… न डरता, न लाजता, कुनाचीबी भिडभाड न ठेवता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवनार… हे जग सुंदर करनार ! सलाम मित्रा अमित. लब्यू लैच. जय शिवराय… जय भीम ! – किरण माने.”

हेही वाचा : “वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी…,” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

तर आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून त्यावर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiran mane shares photo of his facebook friend who wrote jai bhim on his bmw rnv