‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व संपायला अवघे काही दिवस आता शिल्लक राहिले आहेत. येत्या ८ जानेवारीला या पर्वाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व हे विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व हे किरण माने आणि राखी सावंत यांच्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर किरण माने आणि राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
बिग बॉस मराठीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत किरण माने, राखी सावंत, आरोह वेलणकर, अक्षय केळकर प्रेमाबद्दल गप्पा मारताना दिसत आहे. त्यावेळी राखी ही किरण मानेंशी मस्करी करताना दिसत आहे. यावेळी ते सर्वजण प्रेमरोगावर काहीही उपाय नसतो, गोळ्या नसतात, उपचार नसतो असे सांगताना दिसत आहे.
त्यानंतर दुसऱ्या एका व्हिडीओत किरण माने हे एका प्लेटवर RK असे इंग्रजीत लिहिताना दिसत आहे. त्याबरोबरच त्यांनी लाल रंगाच्या नेलपेंटने हार्टही काढला आहे. त्यावेळी अपूर्वा ही प्रिय राखी असे लिहिताय का असे विचारते. त्यावर किरण माने हे मी RK असं लिहितोय, पण ते खरंतर RM असं हवंय म्हणजे ते राखी माने असं होईल. त्याबरोबरच किरण मानेंनी त्या प्लेटच्या मागे हार्ट शेप काढून राखी आणि किरण असे लिहिले आहे.
राखी आणि किरण यांचा हा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक जण विविध कमेंट करताना दिसत आहे. दरम्यान यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सध्या बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन कोण जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.